Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैत्री एक अतूट बंधन

Friendship is an inseparable bond friendship day in marathi webdunia marathi
, सोमवार, 7 जून 2021 (22:02 IST)
1 वय कितीही होवो 
शेवटच्या श्वासापर्यंत 
खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं 
एकच असतं ते म्हणजे "मैत्री"
 
2  मैत्री हसवणारी असावी
मैत्री चीडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी 
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी.
 
3  मला नाही माहीत की मी एक 
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!
 
4  देव ज्यांना रक्ताच्या 
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
 
5  मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच 
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला "विश्वास"
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच 
मैत्री म्हणतात.
 
6  एकदा राधाने कृष्णाला विचारले
मैत्रीचा काय फायदा आहे
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो 
तिथे "मैत्री" कधीच नसते.
 
7  जीवनाच्या प्रत्येक वळणावर 
आठवण येत राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील.
 
8 रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात 
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात 
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
 
9 हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल…
 
10 माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली,
काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही,
एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे,
मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना…
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

8 जून : 'World Brain Tumor Dayलक्षण आणि उपचार पद्धती जाणून घ्या