Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावं?

Webdunia
Guru Purnima 2023 गुरुपौर्णिमा सण संपूर्ण भारतात मोठ्या भक्तीभावाने आणि थाटामाटात साजरा केला जातो. यावर्षी गुरुपौर्णिमा 3 जुलै 2023 रोजी सोमवारी साजरी होत आहे. हा सण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला चार वेदांचे पहिले प्रवर्तक महर्षि वेद व्यास यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. 
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, ऋषी-मुनी, शिक्षक, गुरु पादुका, गुरु दर्शन आदींची पूजा करण्याचे महत्त्व आहे.
 
भारतात एकापेक्षा एक संत, महापुरुष आणि विद्वान झाले आहेत. परंतु त्यापैकी महर्षी वेद व्यास हे चारही वेदांचे पहिले प्रवर्तक होते, म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा केली जाते. आणि व्यासजींनीच आम्हाला वेदांचे ज्ञान दिले म्हणून ते आमचे आदिगुरू झाले. म्हणूनच या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.
 
या दिवशी काय केले जाते ते जाणून घेऊया-
- आषाढ शुक्ल पौर्णिमा/गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजा केली जाते.
 
- या दिवशी महर्षी वेद व्यासांची आठवण आपल्या मनात ताजी राहावी म्हणून पायांना आपल्या गुरुंच्या व्यासजींचा अंश मानून त्यांची पूजा केली जाते.
 
- या दिवशी गुरूंची पूजा केल्यानंतर त्यांना मिठाई, कपडे, दान इत्यादी अर्पण केले जाते.
 
- गुरुपौर्णिमेला व्यासजींनी रचलेल्या ग्रंथांचे मनन केले जाते आणि त्यांच्या शिकवणुकीची अंमलबजावणी केली जाते.
 
- गुरुपौर्णिमेला गुरूंच्या चरणी बसल्याने त्यांची कृपा प्राप्त होते.
 
- गुरुर्ब्रह्मा गुरुःर्विष्णु र्गुरुदेवो महेश्वरः। गुरुः साक्षात परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ या श्लोकचे पठण केलं जातं.
 
- या दिवशी उज्वल भविष्यासाठी गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो.
 
- गुरुपौर्णिमेला, शिक्षक/शिक्षिका व्यतिरिक्त, आई-वडील, भावंड आणि सर्व वडीलधारी मंडळींची पूजा केली जाते आणि त्यांचे आशीर्वादही घेतले जातात.
 
- या दिवशी विशेष मंत्रांचा उच्चार करून गुरुंची स्तुती केली जाते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी पूजेदरम्यान या शक्तिशाली स्तोत्राचा पाठ करा, तुमची इच्छा पूर्ण होईल

Mahabharat : हे 4 लोक महाभारत युद्ध पाहत होते पण कोणत्याही प्रकारे सहभागी नव्हते

आरती गुरुवारची

Ramayan: राम आणि रावणाच्या युद्धात या चार पक्ष्यांची भूमिका काय होती?

Rice Kheer recipe : पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments