Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हनुमान जयंती: पानांचा हा उपाय, अडचणींवर करेल मात

hanuman jayanti 2019
हनुमान जयंतीला पिंपळाच्या 11 पानांचा उपाय अमलात आणावा. ब्रह्म मुहूर्तात उठावे. नंतर स्नान इत्यादी करून एखाद्या पिंपळाच्या झाडाचे 11 पानं तोडावे. पान खंडित नसावे. या 11 पानांवर स्वच्‍छ पाण्यात कुंकू, अष्टगंध किंवा चंदन मिसळून श्रीराम असे लिहावे. नाव लिहिताना हनुमान चालीसा पाठ करावा. सर्व पानांवर 'श्रीराम' नाव लिहून या पानांची एक माळ तयार करावी. ही माळ कोणत्या ही हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बलीला अर्पित करावी.
 
बनारसी पान अर्पित करावे
हनुमान जयंतीला हनुमानाला तयार बनारसी पान अर्पित करावा. याने हनुमानाची कृपा प्राप्त होते.
 
रामायण किंवा श्रीरामचरित मानसचा पाठ करणार्‍यांना भक्तांना हनुमानाचे विशेष स्नेह प्राप्त होतं. हनुमान जयंतीला संध्याकाळी हनुमानाला केवडा अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पित करावी. याने हनुमान प्रसन्न होतात.
 
तसेच हनुमानाला विशेष पान अर्पित केल्याने जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतात.
 
कसे तयार कराल हनुमानाचा विशेष पान
या पानात केवळ कत्था, गुलकंद, बडीशेप, खोबरा बुरा आणि सुमन कतरी घालावी. हे पान ताजे, गोड आणि रसभरीत असावे. यात चुना, तंबाखू आणि सुपारी टाकू नये हे लक्षात घ्यावे.
 
कसे करावे हनुमानाला पान अर्पण 
विधी-विधानाने पूजन केल्यानंतर म्हणावे 'हे हनुमान. हे गोड पान अर्पित करत आहे. माझ्या जीवनात देखील असाच गोडवा असू दे. अशी प्रार्थना करत पान अर्पण केल्याने प्रत्येक समस्या दूर होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हनुमानाला प्रसन्न करायचे असेल तर या 8 गोष्टी लक्षात ठेवाव्या