गुरुवार हा दिवस भगवान विष्णुंना समर्पित असतो. या दिवशी विष्णु आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा-अर्चना केली जाते. सोबतच कुंडलीत गुरु मजबूत करण्यासाठी देवगुरु बृहस्पतीची पूजा देखील केली जाते. ज्योतिषीप्रमाणे कुंडलीत गुरु मजबूत असल्यास करिअर आणि व्यवसायात मनाप्रमाणे यश मिळतं. सोबतच घरात सुख समुद्धी राहते. म्हणून कुंडलीत गुरु मजबूत असणे आवश्यक आहे. या दिवशी विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही भगवान विष्णूचे उपवास करतात. यामुळे विवाहित महिलांना आनंद मिळतं तर अविवाहित मुलींचे लग्न लवकर होते. गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने माणसाला इच्छित फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. यासोबतच जगाचाराचा आशीर्वादही प्राप्त होतो. तुम्हालाही भगवान श्री हरींचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर गुरुवारी या मंत्रांचा जप करा-