सर्वप्रथम पूजनीय देवता गणपती भक्तांचे सर्व संकट दूर करतात. देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजन, स्तोत्र पाठ आणि मंत्रोच्चारण करावे. सोबतच गणपती अथर्वशीर्ष स्त्रोताचा पाठ करणे फलदायी ठरतं. याचे पाठ केल्याने व्यक्तीच्या दु:खाचा अंत होतो. सर्व सिद्धी प्राप्त होते. तसेच पाठ करताना पूजन करुन गणरायाला सुगंध, अक्षत, पुष्प, धूप, दीप व नैवेद्य दाखवावा. सोबतच गणपतीला प्रिय दूर्वा अर्पित कराव्या. लाल फुलांची माळ अर्पित करावी. याने घरात सुखाचे आगमन होतं. सोबतच उच्चारण स्पष्ट असावं.
ज्यांच्या कुंडलीत राहू, केतू आणि शनी यांचा अशुभ प्रभाव असेल त्यांच्यासाठी हा गणपती अथर्वशीर्ष पाठ खूप फायदेशीर ठरेल. अशा व्यक्तीने दररोज गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. यामुळे व्यक्तीचे दुःख दूर होतं.
जर मुले आणि तरुणांना अभ्यासात मन लागत नसेल, अभ्यासात लक्ष केंद्रित करता येत नसेल, तर हे पठण नियमितपणे करावे. यामुळे एकाग्रता वाढते.
गणपती अथर्वशीर्ष पाठ करण्याचे फायदे
गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्याने अशुभ ग्रह शांत होतात आणि भाग्यासाठी कारणीभूत ग्रह बलवान होतात.
गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्याने मानसिक शांती लाभते आणि आत्मविश्वास वाढतो. यामुळे मन स्थिर राहून अचूक निर्णय घेण्यास सक्षम होते.
रोज गणपती अथर्वशीर्ष पाठ केल्यास जीवनात स्थिरता येते.
याने कामातील अनावश्यक अडथळे दूर होतात.
अथर्वशीर्ष अनेक भाविक दररोज म्हणत असतात. मात्र गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम पाळावे लागतात. ते नियम पाळून अथर्वशीर्षाचे पठण केल्यास उत्तम फलश्रुती प्राप्त होते.
* उच्चार अगदी स्पष्ट असावे.
* अथर्वशीर्ष एकाच गतीने अतिशय हळू बोलला पाहिजे.
* अथर्वशीर्ष म्हणण्यापूर्वी स्नान करावे.
* अथर्वशीर्ष अर्थपूर्णरीत्या पठण केले पाहिजे.
* अथर्वशीर्ष एकापेक्षा जास्त वेळा म्हणावे लागेल तेव्हा 'वरदमूर्तये नमः'. इथपर्यंत वाचावे. त्यानंतर वटच्या आवर्तनानंतर पठण करावे.
* अथर्वशीर्षापूर्वी दिलेला शांती मंत्र प्रत्येक पठणापूर्वी न म्हणता सुरुवातीला एकदाच उच्चारावा.
* गणेश अथर्वशीर्षाची एकवीस आवृत्ती म्हणजे अभिषेक.
* गणेश अथर्वशीर्षाचे पठण करताना धूतशास्त्र, मृगजीन, धबली किंवा दर्भ चटई वापरावी.
* अथर्वशीर्ष पठण करताना मांडी बदलणार नाही याची काळजी घ्यावी.
* दक्षिण दिशेशिवाय इतर कोणत्याही दिशेला तोंड करून बसावे.
* अथर्वशीर्ष पाठ करण्यापूर्वी गुरूंना तसेच ज्येष्ठांना नमस्कार करावा.
* अथर्वशीर्ष पठण करण्यापूर्वी गणपतीची पूजा करून अक्षता, दुर्वा, शमी आणि लाल फुले वाहावीत.
* पूजा करणे शक्य नसेल तर गणपतीच्या मनःस्थितीचे ध्यान करावे, नमस्कार करावा.