Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गायत्री मंत्राच्या 24 अक्षरांमध्ये चमत्कारी शक्ती

Webdunia
गायत्री मंत्रात चोवीस (24) अक्षर आहेत. ऋषिमुनींनी या अक्षरांमध्ये बीजरुपात विद्यमान त्या शक्ती ओळखल्या ज्यांना चोवीस अवतार, चोवीस ऋषी, चोवीस शक्ती आणि चोवीस सिद्धी मानले गेले आहेत. गायत्री मंत्राच्या चोवीस अक्षरांमध्ये चोवीस देवता आहेत. याने काय लाभ मिळू शकतो त्याचे वर्णन असे आहेत: 
 
1. तत्: देवता - गणपती, यश शक्ती
फल : अवघड कामात यश, विघ्नांचा नाश, बुद्धीत वृद्धीत
 
2. स: देवता- नरसिंह, पराक्रम शक्ती
फल : पुरुषार्थ, पराक्रम, शूर, शत्रूनाश, दहशत-आक्रमणाने रक्षा
 
3. वि: देवता-विष्णू, पालन शक्ती
फल : प्राण्यांचे पालन, अवलंबून असलेल्यांचे संरक्षण, पात्रतेत वृद्धी
 
4. तु: देवता- शिव, कल्याण शक्ती
फल : अनिष्टाचा विनाश, कल्याण वृद्धी, निश्चितता, आत्म-दया
 
5. व: देवता- श्रीकृष्ण, योग शक्ती
फल : क्रियाशीलता, कर्मयोग, सौंदर्य, सरसता, अनासक्ती, आत्मनिष्ठा
 
6. रे: देवता- राधा, प्रेम शक्ती
फल : प्रेम-दृष्टी, शत्रुत्वाची समाप्ती
 
7. णि: देवता- लक्ष्मी, धन शक्ती
फल : धन, पद, यश आणि भोग्य पदार्थांची प्राप्ती
 
8. यं: देवता- अग्नी, तेज शक्ती
फल : प्रकाश, शक्ती आणि सामर्थ्यात वृद्धी, प्रतिभावान आणि तेजस्वी होणे
 
9. भ : देवता- इंद्र, रक्षा शक्ती
फल : रोग, हिंसक चोर, शत्रू, भूत-प्रेतांच्या आक्रमणापासून रक्षा
 
10. र्गो : देवता- सरस्वती, बुद्धी शक्ती
फल: मेधाचा विकास, बुद्धिमत्ता मध्ये पवित्रता, दूरदृष्टी, चतुराई, विवेक
 
11. दे : देवता- दुर्गा, दमन शक्ती
फल : विघ्नांवर विजय, दुष्टांचे दडपण, शत्रूंचा नाश
 
12. व : देवता- हनुमान, निष्ठा शक्ती
फल : कर्तव्यपरायणता, निष्ठावान, विश्वासी, निर्भयता आणि ब्रह्मचर्य-निष्ठा
 
13. स्य : देवता- पृथिवी, धारण शक्ती
फल : गंभीरता, क्षमाशीलता, भार सहन करण्याची क्षमता, सहिष्णुता, दृढता, सहनशीलता
 
14. धी : देवता- सूर्य, प्राण शक्ती
फल : आरोग्य-वृद्धी, दीर्घ जीवन, विकास, वृद्धी, उष्णता, कल्पनांचे परिष्करण
 
15. म : देवता- श्रीराम, मर्यादा शक्ती
फल : तितिक्षा, कष्टात विचलित न होणे, मर्यादापालन, मैत्री, सौम्यता, संयम
 
16. हि : देवता- श्रीसीता, तप शक्ती
फल: निर्विकारता, पवित्रता, शील, गोडवा, नम्रता, सात्त्विकता
 
17. धि : देवता- चंद्र, शांती शक्ती
फल : उद्विग्नतेचा नाश, काम, क्रोध, लोभ, मोह, चिंता निवारण, आशेचा संचार
 
18 . यो : देवता- यम, काल शक्ती
फल : मृत्यू निर्भयता, वेळाचा सदुपयोग, स्फुरती, जागरूकता
 
19. यो : देवता- ब्रह्मा, उत्पादक शक्ती
फल: संतानवृद्धी, उत्पादन शक्तीत वृद्धी
 
20. न: देवता- वरुण, रस शक्ती
फल : भावनिकपणा, साधेपणा, कला प्रेम, दुसर्‍यांसाठी दयाभाव, सौम्यता, प्रसन्नता, आर्द्रता, माधुर्य, सौंदर्य
 
21. प्र :देवता- नारायण, आदर्श शक्ती
फल : महत्त्वाकांक्षा-वृद्धी, दिव्य गुण-स्वभाव, उज्ज्वल चरित्र, पथ-प्रदर्शक कार्यशैली
 
22. चो : देवता- हयग्रीव, साहस शक्ती
फल : उत्साह, शूर, निर्भयता, शूरता, आपत्तींना तोंड देण्यासाठी सामर्थ्य, पुरुषार्थ
 
23. द : देवता- हंस, विवेक शक्ती
फल : उज्ज्वल कीर्ति, आत्म-संतोष, दूरदर्शिता, सत्संगती, सत्य-असत्याचे निर्णय घेण्याची क्षमता, उत्तम आहार-विहार
 
24. यात् : देवता-तुलसी, सेवा शक्ती
फल : लोकसेवेत रुची, सत्यनिष्ठा, पातिव्रत्यनिष्ठा, आत्म-शांती, परदु:ख-निवारण

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Apara Ekadashi 2025 Naivedya अपरा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला हे पदार्थ अपिर्त करा, श्री हरीचा आशीर्वाद कायम राहील

Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

Friday Remedies:शुक्रवारी केलेले हे छोटेसे काम तुमचे नशीब बदलेल आणि भरपूर पैसा मिळेल

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

पुढील लेख
Show comments