Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुष्य नक्षत्र : या शुभ प्रसंगी गायीला या प्रकारे खाऊ घाला पोळी

pushya nakshatra
धनासंबंधी प्रयोग, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद व देवीची आराधना आणि आपल्यास सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी पुष्य नक्षत्र हा दिवस श्रेष्ठ मानला गेला आहे. या दिवशी केलेले कार्य फलीभूत होतात. ज्योतिष्याप्रमाणे या दिवशी कुंडलीत विरुद्ध योग असले तरी पुष्य नक्षत्रात केलेले कार्य निश्चित सिद्ध होतात. पुष्य नक्षत्रात इतर सर्व योगांचे दोष नाहीसे होतात. तसेच कार्तिक अमावास्येपूर्वी येणार्‍या पुष्य नक्षत्राला शुभ मानले गेले आहे. तर जाणून घ्या या दिवशी काय केल्याने लाभ मिळतो.
 
या दिवशी नवीन बहीखाते, लेखन सामग्री शुभ मुहूर्तावर खरेदी करून व्यावसायिक प्रतिष्ठानात स्थापित करावी. या व्यतिरिक्त सोनं, चांदी, मौल्यवान रत्न, दागिने खरेदी करावे. या दिवशी खरेदी केल्या जाणार्‍या वस्तू वर्षभरासाठी फायदेशीर ठरतात.
 
कार्तिक पुष्य नक्षत्रच्या दिवशी आपल्या आराध्य देवता, कुलदैवत यांचे पूजन करावे. 
या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करू शकतात.
व्यापारी वह्यांची पूजा करून कार्य सुर करता येऊ शकतं.
नवीन भांडी खरेदी करून वापरणे सुरू करावे.
नवीन वाहन खरेदी करण्यासाठी हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त ठरेल.
सोनं, चांदी, मौल्यवान रत्न, दागिने खरेदी करू शकता. या दिवशी खरेदी केलेल्या मौल्यवान वस्तू लाभदायक ठरतात आणि अशाने सोनं-नाणं वाढतं असे ही म्हणतात.
घरात सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा. आणि देवीला लाल रंगाचे फुल अर्पित करावे.
या दिवशी तूप लावलेल्या पोळीत गूळ ठेवून गायीला खाऊ घालावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

10 वर्षांनंतर पुष्य नक्षत्र आणि शुभ योगात साजरी होईल अष्टमी