Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथांचे अभंग 41 ते 50

Webdunia
सोमवार, 13 जून 2022 (12:54 IST)
परेसि परता पश्‍यंति वरुता । मध्यमे तत्त्वता न कळे हरी ॥१॥
तें हें कृष्णरूप गौळियांचे तप । यशोदे समीप समीप नंदाघरी ॥२॥
चोखट चोखाळ मनाचे मवाळ । कांसवीचा ढाळ जया नेत्रीं ॥३॥
निवृत्ति सर्वज्ञ गुरूची धारणा । ब्रह्म सनातना माजि मन ॥४॥
*****
रूप नाम अरूप रूपाचें रूपस । कांसवी डोळस निगमागमें ॥१॥
तो हा ब्रह्मामाजि गोपाळ सांगाती । यशोदे हो प्रति दूध मागे ॥२॥
जो रेखा अव्यक्त रेखेसिहि पर । दृश्य द्रष्टाकार सर्वाभूतीं ॥३॥
निवृत्ति तटाक चक्रवाक एक । वासनासि लोक गुरुनामें ॥४॥
*****
वर्ण व्यक्ति सरवे वर्णाश्रम मुखें । ब्रह्मनाम सौख्य योगीजन ॥१॥
तें हें कृष्ण नाम देवकीसबळ । वसुदेवकुळ गोपवेषे ॥२॥
धर्म धरि धार धारणा धीरट । निरालंब पीठ सौख्य शोभा ॥३॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग । गुरुनामें पांग हरे एक ॥४॥
*****
मंगल मांगल्य ब्रह्म हें सखोल । ब्रह्मरूपें खोल ब्रह्म भोगीं ॥१॥
तें हें कृष्ण नाम वोळलें त्या नंदा । आनंदें यशोदा गीत गात ॥२॥
विश्वाद्य वेदाद्य श्रुतीसी अभेद्य । तें ब्रह्मपणे वंद्य ब्रह्म भोगी ॥३॥
निवृत्ति सौभाग्य ब्रह्म सर्व सांग । गुरुनामें पांग हरे एक ॥४॥
*****
ज्ञानेंसे विज्ञानी उन्मनि निमग्न । द्वैत रूपें भग्न उरो नेदी ॥१॥
तोचि हा गोपाळ गोपिसंगे खेळे । गो गोपाळ मेळे नंदाघरीं ॥२॥
दृश्य द्रष्टा सर्व तितिक्षा उपरती । श्रुतीसी संपत्ति येथें जाण ॥३॥
निवृत्ति सधर गोरक्ष गयनी । ब्रह्मरूपी पूर्णी समरसे ॥४॥
*****
ग्रासूनी भान मान दृश्य द्रष्टा भिन्न । आपण चिद्धन वैकुंठी रया ॥१॥
तें रूप सखोल कृष्ण रूपें खेळें । नंदयशोदेमेळें गोपीसंगें ॥२॥
नित्यता प्रकाश सर्व पूर्ण सार । आपण श्रीधर सर्व सुखें ॥३॥
तेंची हें रूपडें कृष्णनामें पिकलें । यमुने स्थिरावलें वेणू वातां ॥४॥
ज्योतिरूपें कीर्ण अनंत विस्तार । ब्रह्मांड आकार अनंतकोटी ॥५॥
निवृत्ति सोज्वळ नित्य नुतन सोय । आपणची होय गोपरूपें ॥६॥
*****
गगनवाड दृष्टी सर्व तत्त्व शेखीं । जीव शिव पोखी कारण सिद्ध ॥१॥
तेची हें सांवळें स्वरूप गोजिरें । कृष्णनाम खरें नंदाघरीं ॥२॥
पृथ्वीचें तळवट अनंत विराट । आपण वैकुंठ गोपीसंगे ॥३॥
निवृत्ति तप्तर लक्षते स्वानंद । नित्यता आनंद ब्रह्मानंदे ॥४॥
*****
नेणती महिमा ब्रह्मादिक भद्रा । आणि ते महेंन्द्र नानस्थानी ॥१॥
तें रूप खेळत गौळियांच्या संगे । पुंडलिका मागे भीमातीरी ॥२॥
उत्पत्ति उलथा न चले तो मार्ग । दुजियाचा संग नाहीं ज्यासी ॥३॥
निवृत्ति प्रगट गुरुमंत्र फळद । गोपाळ विद्नद ब्रह्म सेवी ॥४॥
*****
सिद्धीचे साधन नेणती । ते सिद्ध अधिक उद्धोध आनंदाचा ॥१॥
तें रूप सांवळें देवकीये लीळे । भोगिती सोहळे कृष्णरूपें ॥२॥
उन्मनी अवस्था लाविती ते मुनी । अखंडता ध्यानीं कृष्णसुख ॥३॥
निवृत्ति ठकार श्रुतीचा आकार । गोपाळ साकार अंकुरले ॥४॥
*****
नसे तो ब्रह्मांडी नसे तो वैकुंठीं । दुजियाची गोष्टी नाहीं तेथें ॥१॥
तें रूप सुंदर देवकी उदरीं । वसुदेव घरीं कृष्ण माझा ॥२॥
ब्रह्मांडकडवा मनाचा वोणवा । साधितां राणिवा हारपती ॥३॥
निवृत्ति सुंदर कृष्णरूप सेवी । गयनीगोसावी उपदेशिलें ॥४॥
*****

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती शनिवारची

कूर्मस्तोत्रम्

शनिवारी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे काम नक्की करा

वामनस्तोत्रम्

108 names of goddess Lakshmi देवी लक्ष्मीची 108 नावे, शुक्रवारी जपा आणि कृपा‍ मिळवा

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

पुढील लेख
Show comments