Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

कान पकडून उठाबशा करण्यामागील शास्त्रीय आधार

kaan
, सोमवार, 11 सप्टेंबर 2023 (16:44 IST)
हिंदू जीवनशैलीतील अनेक गोष्टी का केल्या जातात हा प्रश्न कोणीही विचारला की गोंधळ उडतो. जर तुम्ही आजही पाहत असाल तर काही लोक मंदिरात, विशेषतः गणपती मंदिरात जातात, तेव्हा लोक परमेश्वरासमोर दोन्ही हातांनी विरुद्ध कान धरून उठाबशा काढतात- डावा कान उजव्या हाताने आणि डाव्या हाताने उजवा कान पकडून. कालांतराने याला आंडबर म्हणून बघू लागले पण हे माहित आहे का हे योग्य पद्धतीने केल्यास त्याचा खूप चांगला परिणाम होतो.
 
मात्र आता यावर अनेक अभ्यास झाले आहेत. जर तुम्ही तुमचे कान अशा प्रकारे धरून काही क्रिया वेगाने केली तर उजव्या आणि डाव्या मेंदूमधील संवाद लक्षणीय वाढेल. तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल की ही प्रक्रिया गणपतीसमोर केली जाते. गणपती हा बुद्धिमत्तेचे देवता मानले जातात. ते सर्वात कुशाग्र आणि सक्षम असल्याचे मानले जातात. ते इतके बुद्धिमान मानले जातात की देशातील सर्व पुराणे आणि धर्मग्रंथ त्यांनी लिहिलेले असल्याचे मानले जातात. जेव्हा त्यांनी लिहायला सुरुवात केली तेव्हा आव्हान देत म्हणाले, 'जेव्हा तुम्ही काही बोलून लिहिवण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्ही मधे क्षणभरही थांबणार नाही, तुम्ही मध्येच थांबलात तर मी पुन्हा तुमच्यासाठी काम करणार नाही.’ खरं तर त्यांच्या हे बोलण्यामागची भावना अशी होती की तो समोरच्या व्यक्तीकडून एका विशिष्ट पातळीवरील बुद्धिमत्तेची अपेक्षा करत होते.
 
शांभवी महामुद्रा मेंदूच्या दोन भागांमध्ये समन्वय आणते
तुमची बुद्धिमत्ता किती लवचिक आणि प्रभावी आहे हे तुमच्या मेंदूचे डावे आणि उजवे भाग एकमेकांशी किती समन्वय साधू शकतात यावर अवलंबून आहे. आपण शांभवी महामुद्राच्या बाबतीत पाहिलं आहे की तिच्या योग्य सरावाने मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांमधील संतुलन सहा ते बारा आठवड्यांच्या आत प्रचंड वाढते. हे अभ्यासातून सिद्ध झाले आहे.
 
पूर्वी ते एकमेकांशी ज्या पद्धतीने संवाद साधत होते त्यात खूप फरक होता. किंवा दुसऱ्या शब्दांत असे म्हणता येईल की, त्यानंतर अर्धा मेंदू वापरण्याऐवजी तुम्ही संपूर्ण मेंदू वापरण्यास सुरुवात करता. त्यामुळे अशा अनेक प्रथा आणि परंपरा आहेत. भारतात ही एक सामान्य प्रथा होती की जर एखादे मूल खूप खेळकर किंवा आळशी असेल तर शिक्षक त्यांना या प्रकारे शिक्षा करत असे - कान पकडून उठाबशा काढा. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतुलन निर्माण झाले. या सर्व वैज्ञानिक प्रक्रिया होत्या.
 
शिवाय उठाबशा काढण्यासाठी जेव्हा आपण गुडघ्यांनी खाली बसून पुन्हा उभे रहता, तेव्हा आपल्या शरिरातील मणके आणि पायांतील सर्व सांधे यांची हालचाल होते ज्यामुळे शरिरातील ऊर्जा कार्य होते. कान धरल्याने कार्यरत झालेल्या सुषुम्नानाडीमुळे उच्च स्तराची ऊर्जा निर्माण होते. ही सर्व सांध्यांपर्यंत आणि शरीरभर पोहचते आणि तेथे त्रासदायक शक्ती असल्यास त्याचा त्रास दूर होतो. 
 
थोडक्यात कान पकडून उठाबशा काढल्याने शरीर आणि मन यांना ऊर्जा मिळते. आजचे संपूर्ण विज्ञान हे केवळ पुस्तकी आणि बौद्धिकतेपुरते मर्यादित आहे. त्यामुळे या नियमांमागे काही वैज्ञानिक आधार आहे, पण त्यात काही सुधारणा आणि स्पष्टीकरणही आवश्यक आहे, कारण कालांतराने ते खूप विकृत झाले असण्याची शक्यता आहे. 
 
यामागील कारण म्हणजे गेल्या काही शतकांमध्ये त्यांचे प्रसारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याची क्रिया लक्षणीयरीत्या विस्कळीत झाली आहे. कदाचित या अडथळ्यांमुळे हे नियम त्यांच्या शुद्ध स्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले नसतील आणि त्यात काही विचित्र विकृती निर्माण झाली असावी. अशा परिस्थितीत हे नियम सोडून देण्याऐवजी ते दुरुस्त करून आचरणात आणले पाहिजेत. कारण या प्राचीन नियमांना खूप महत्त्व आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मधुराष्टकम्', श्रीकृष्णाची गोड प्रतिमा दाखवणारी स्तुती