Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मंदिराच्या पायरीवर बसून हे म्हणावे

मंदिराच्या पायरीवर बसून हे म्हणावे
, शुक्रवार, 4 जून 2021 (13:38 IST)
वडिलधारी लोकं म्हणतात की मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर देवाचे दर्शन झाल्यानंतर बाहेर येऊन मंदिराच्या पायर्‍यावर किंवा ओटल्यावर जरा वेळ बसावं. आपल्या या परंपरेमागील कारण माहित आहे का- 
 
आजकाल लोक मंदिराच्या पायथ्याशी बसून आपल्या गृह व्यवसायाच्या राजकारणावर चर्चा करतात, परंतु ही प्राचीन परंपरा एका विशिष्ट हेतूने बनविली गेली होती. खरं तर, मंदिराच्या पायथ्याशी बसून आपण एक श्लोक म्हणावा. हल्ली लोकांना याबद्दल विसर पडला आहे किंवा अनेक लोकांना याबद्दल माहितीचं नाही. हा श्लोक खालीलप्रमाणे  आहे- 
 
अनायासेन मरणम् ,बिना देन्येन जीवनम्।
देहान्त तव सानिध्यम्, देहि मे परमेश्वरम् ।।
 
या श्लोकाचा अर्थ असा आहे...अनायासेन मरणम्...... अर्थात म्हणजेच, कोणत्याही अडचणीशिवाय मरण यावं, कधीही पांघरुणात लोळत राहण्याची वेळ येऊ नये, त्रासून मृत्यू प्राप्त न होता चालत-फिरत असताना प्राण त्याग व्हावे.
 
बिना देन्येन जीवनम्......... अर्थात कोणावरही अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये. जसे की एखाद्या आजारामुळे दुसर्‍यांवर अवलंबून राहण्याची वेळ येते तसं होऊ नये. देवाच्या कृपेने भीक मागितल्याशिवाय जीवन जगता यावं.
 
देहान्त तव सानिध्यम ........अर्थात जेव्हा मृत्यु होईल तेव्हा देवासमोर व्हावा. जसे भीष्म पितामह यांच्या मृत्यूवेळी स्वयं प्रभू त्यांच्या समक्ष उभे होते. त्यांचे दर्शन करत त्यांनी प्राण सोडले.
 
देहि में परमेश्वरम्..... हे परमेश्वर आम्हाला असे वरदान द्या.
 
अशी प्रार्थना करा.
 
विशेष:
दर्शनानंतर ही प्रार्थना करावी.. ही प्रार्थना आहे याचना नव्हे. याचना सांसारिक गोष्टींसाठी असते जसे घर, व्यापार, नोकरी, संतान, सांसारिक सुख, धन किंवा इतर सुखांसाठी जी मागणी केली जाते ती याचना असते अर्थात भीक असते. 
 
आम्ही प्रार्थना करतो तर प्रार्थनाचं विशेष अर्थ असतं अर्थात विशिष्ट, श्रेष्ठ. अर्थात निवेदन. देवाला प्रार्थना करा आणि प्रार्थनेत या श्लोकचं उच्चारण करा.
 
जेव्हा आपण मंदिरात जातो, तेव्हा उघड्या डोळ्यांनी परमेश्वराला पाहिले पाहिजे. त्यांचे दर्शन करावं. काही लोकं डोळे बंद करुन उभे राहतात. डोळे का बंद करावे आम्ही तर दर्शनासाठी आलो आहोत. देवाचं स्वरुप, श्री चरण, मुख, श्रृंगार याचं आनंद घ्यावं.
 
डोळ्यात देवाचं स्वरुप भरुन घ्यावं. दर्शन करावं आणि नंतर बाहेर आल्यावर डोळे बंद करुन त्या स्वरुपाचा ध्यान करावं. मंदिरात डोळे बंद करु नये. बाहेर आल्यावर मंदिराच्या पायर्‍यावर बसून डोळे बंद करुन त्यांच्या स्वरुपाचं ध्यान करावं. डोळे बंद करुन या श्लोकाचं उच्चारण करावं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गरूड पुराण: मृत्यू नंतर नरकात भोगावी लागते या 28 गुन्ह्यांची शिक्षा