होलाष्टक 2 मार्च ते 9 मार्च पर्यंत राहील. या दरम्यान शुभ आणि मांगलिक कार्य केले जात नाही. या दरम्यान शुभ कार्य केल्यास समस्यांना सामोरा जावं लागतं.
फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी ते पौर्णिमा पर्यंत होलाष्टक दोष राहील. या दरम्यान विवाह, नवीन निर्माण आणि नवीन कार्य आरंभ करु नये. या दिवसांमध्ये सुरु केलेल्या कार्यांमुळे कष्ट, अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
होलाष्टक म्हणजे
होळीच्या आठ दिवसांपूर्वी होलाष्टकाची सुरुवात होते. होलाष्टक शब्द होळी आणि अष्टक या दोन शब्दांनी मिळून तयार झाला आहे. याचा अर्थ होळीचे आठ दिवस. होलाष्टक फाल्गुन शुक्ल पक्षाच्या अष्टमी तिथी पासून सुरु होऊन फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पोर्णिमे पर्यंत असतं.
अष्टमी तिथीपासून सुरु होत असल्यामुळे देखील याला होलाष्टक असे म्हटलं जातं. आम्हाला होळी येण्याची पूर्व सूचना होलाष्टकने मिळते. या दिवसापासूनच होळी उत्सवसोबतच होलिका दहनाची तयारी सुरु होते.
या दरम्यान उग्र असतात ग्रह
होलाष्टक दरम्यान अष्टमीला चंद्र, नवमीला सूर्य, दशमीला शनी, एकादशीला शुक्र, द्वादशीला गुरु, त्रयोदशीला बुध, चतुर्दशीला मंगळ आणि पौर्णिमेला राहू उग्र स्वभावात असतात. हे ग्रह उग्र असल्यामुळे मनुष्याच्या निर्णय घेण्याची क्षमता कमजोर होते. ज्यामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात. ज्यांच्या कुंडलीत नीच राशीचा चंद्र आणि वृश्चिक राशीचे जातक किंवा चंद्र सहाव्या किंवा आठव्या भावात आहेत. त्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असते. होलाष्टक सुरु झाल्यावर प्राचीन काळात होलिका दहन होणार्या जागेवर शेण आणि गंगाजल व इतर सामुग्रीने सारवण्यात येतं. तसेच तेथे होलिकेचा दंडा लावण्यात येतो.