suvichar

भक्त प्रल्हादाची कथा

Webdunia
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020 (11:43 IST)
होलिका दहन पौराणिक कथा
हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. होळीच्या संदर्भात जी कथा सांगितली जाते ती अशी आहे.
 
एकेकाळी राक्षसकुळात हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता. तो स्वत:ला श्रेष्ठ समजत असे. गवान शंकराला त्यांनी प्रसन्न करून त्यांच्याकडून त्याने त्याला कोणी, पाताळात जमिनीवर तसेच आकाशात मारू शकणार नाही असा वर घेतला. त्यामुळे तो खूप अहंकारी झाला आणि स्वतःला देवापेक्षा बलवान समजायला लागला. देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता. 
 
हिरण्यकश्यपूला प्रल्हाद नावाचा मुलगा होता. प्रल्हाद बालपणापासून विष्णूंचा परमभक्त होता. प्रल्हाद दिवस-रात्र सतत विष्णूंच्या नावाचे नामस्मरण करीत असे. 
 
हिरण्यकश्यपूला हे मान्य नव्हते. देवाचं नामस्मरण करु नये म्हणून त्याने आपल्याला मुलाला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. समजवण्याचा आणि घाबरवण्याचा देखील प्रयत्न केला परंतू प्रत्येकवेळी तो अयशस्वी ठरला. कारण भक्त प्रल्हादावर त्याचा काही परिणाम होत नव्हता. 
 
अखेर हिरण्यकश्यपूने आपल्याच मुलाचा वध करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी त्याने आपल्या बहिणी होलिकाची मदत घेतली. होलिकाला वरदान मिळालं होतं की तिला आग भस्म करु शकत नाही. म्हणून तिला अग्नीचे भय नव्हते. 
 
हिरण्यकश्यपूने होलिकेला भकत प्रल्हादाला मांडीवर घे?न आगीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद तेव्हा देखील भगवान विष्णूंच्या नामस्मरणात तल्लीन होता.  
 
प्रल्हादाच्या भक्तिसाधनेमुळे उलटेच घडले. त्या चितेमध्ये होलिका जळून खाक झाली आणि विष्णू भक्त असल्यामुळे प्रल्हादाला अग्नी देखील काही करु शकली नाही. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने खांबातून नृसिंह रूपाने हिरण्यकश्यपूचा वध केला. अशाप्रकारे त्यादिवशी लोकांनी उत्सव साजरा केला. आणि तो दिवस ‘होलिका दहन’ म्हणून ओळखू लागले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Chaitra Navratri 2026 चैत्र नवरात्र कधीपासून? मुहूर्त, पूजा विधी आणि महत्तव जाणून घ्या

Sheetala Saptami 2026 शीतला सप्तमी; तारीख, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत जाणून घ्या

Mangalwar Upay: हनुमान चालिसामध्ये दडले आहे, रोग-दोष निवारणाचे रहस्य!

आरती मंगळवारची

Sheetala Saptami 2026: शीतला सप्तमीला शिळे अन्न का खाल्ले जाते? त्यामागील धार्मिक कारण जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Rangpanchami 2026 Wishes In Marathi रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

इराण-इस्रायल युद्ध: भविष्य मालिका यांच्या भविष्यवाण्या खऱ्या ठरण्याची वेळ आली का?

Women's Day 2026 Speech in Marathi महिला दिन भाषण मराठी

कोपर आणि काळ्या गुडघ्यासाठी घरगुती उपाय

शरीरासाठी एकाच वेळी किती अन्न खावे? अति खाण्याचे 'हे' गंभीर दुष्परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments