Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shivrajyabhishek Din 2026 Wishes in Marathi शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

प्रौढ प्रताप पुरंदर, 
क्षत्रिय कुलावतंस, 
सिंहासनाधीश्वर, 
महाराजाधिराज, 
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय! 
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
''माती साठी प्राण सांडतो युद्ध मांडीतो ऐसा राजा 
जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा'' 
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
 
इतिहासाच्या पानावर, 
रयतेच्या मनावर, 
मातीच्या कणावर 
आणि विश्वासाच्या प्रमाणावर 
राज्य करणारा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती! 
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
मराठी मनाचा, अभिमानाचा 
आणि स्वराज्याचा सुवर्णक्षण!
शिवराज्याभिषेक दिनाच्या 
सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा! जय शिवराय!
 
होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, 
थाट हिंदवी स्वराज्याचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा... 
शिवराज्याभिषेक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
 
"हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!" 
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, 
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 
राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मानाचा मुजरा!
 
६ जून १६७४... 
ज्या दिवशी रयतेला आपला हक्काचा राजा मिळाला, 
त्या सुवर्ण दिवसाच्या 
सर्व शिवभक्तांना शिवस्वराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
इतिहासालाही धडकी भरेल असं धाडस या मातीत घडलं, 
दगड धोंड्यांच्या स्वराज्यात सुवर्ण सिंहासन सजलं! 
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता, 
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता... 
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
शिवरायांचे विचार, शिवरायांचा आचार आणि शिवरायांचे संस्कार जपणे हाच खरा राज्याभिषेक!
शिवस्वराज्य दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा!
 
मराठा साम्राज्य ज्या दिवशी सिंहासनावर आरूढ झाले, 
तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक!
या मंगलमय आणि ऐतिहासिक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!
 
हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच” काळीज हवं...
शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा...
 
हे शिवराया, तुमच्याच मुळे आज आपण ताठ मानेने जगत आहोत
स्वराज्याच्या या ऐतिहासिक सुवर्णक्षणाच्या आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
 
अवघ्या महाराष्ट्राला लागला ज्यांचा लळा
त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिवभक्त झाले गोळा
डोळ्यांचे पारणं फेडणारा असा हा राज्याभिषेक सोहळा
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा!
 
इतिहासाच्या पानापानावर ज्यांच्या शौर्याची गाथा कोरली आहे, 
त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीस आणि शिवराज्याभिषेक दिनास मानाचा मुजरा!
 
सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 
पवित्र पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या 
'शिवराज्याभिषेक दिना'च्या सर्व मराठी बांधवांना शिवमय शुभेच्छा!
जय जिजाऊ, जय शिवराय!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रीयन माणसाच्या दिलाचा तुकडा! "पिठलं भाकरी" अस्सल मराठमोळी रेसिपी