Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

गॅस गळतीमुळे कॅन्टीनमध्ये झालेल्या स्फोटात 16 ठार, 10 जखमी

गॅस गळतीमुळे कॅन्टीनमध्ये झालेल्या स्फोटात 16 ठार, 10 जखमी
, शनिवार, 8 जानेवारी 2022 (19:28 IST)
दक्षिण -पश्चिम चीनमध्ये शुक्रवारी संशयास्पद वायू गळतीमुळे इमारत कोसळून किमान 16 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी ढिगाऱ्याखाली अडकल्याने आणखी 10 जण गंभीर जखमी झाले. चीनच्या स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, वुलाँग जिल्ह्यातील चोंगकिंगमध्ये हा स्फोट झाला. सरकारी वृत्तसंस्थेनुसार, ढिगाऱ्यातून बाहेर काढलेला एक माणूस मृत्यूशी झुंज देत आहे.  वुलाँग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात दुपारी 12:10 वाजता संशयास्पद गॅस गळतीमुळे झाला, ज्यामुळे स्फोट झाला आणि कॅन्टीनची इमारत कोसळली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा लोक कॅन्टीनमध्ये जेवण करत होते. अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर, चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने बचाव प्रयत्नांना मार्गदर्शन करण्यासाठी अनेक तज्ञांना पाठवले.
आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री हुआंग मिंग यांनी परिस्थितीची तात्काळ पाहणी, अडकलेल्या बळींची नेमकी संख्या, अपघाताचे कारण आणि असे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी मोहीम राबविण्याची घोषणा केली. स्थानिक अग्निशमन आणि बचाव विभागाने 260 तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जन्मदात्या पित्यानेच 6 वर्षाच्या चिमुकलीला गळफास दिला, पिताला अटक