यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रिचर्ड थेलर यांना मिळाला आहे. 1945 साली जन्मलेल्या रिचर्ड थेलर यांना वयाच्या 72 व्या वर्षी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. अर्थशास्त्राचं मानसशास्त्र समजून सांगणाऱ्या थेलर यांचा यंदा नोबेल समितीने पुरस्काराने गौरव केला.
यंदा अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजनही होते. त्यामुळे या पुरस्काराकडे देशवासियांचं लक्ष लागलं होतं. आर्थिक समस्या कशा दूर करता येतील, याबाबत रिचर्ड थेलर यांनी सोप्या भाषेत पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकांपैकी एक आहे.