Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पत्नी-मुलाच्या हत्येनंतर पतीचे टोकाच पाऊल

Webdunia
रविवार, 7 जानेवारी 2024 (16:34 IST)
नवरा बायको मध्ये किरकोळ कारणामुळे वाद झाल्यावर नवऱ्याने रागाच्या भरात येऊन पत्नी आणि पोटच्या मुलांना विषारी औषध पाजून त्यांचा खून करून स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यात वारणवाडी येथे देवमळा येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे. गजानन भाऊ रोकडे, पौर्णिमा गजानन रोकडे,दुर्वेश गजानन रोकडे अशी मयत व्यक्तींची नावे आहेत. या पैकी मुलाचा मृतदेह एका पाण्याच्या डबक्यात आढळून आला.

या सर्व प्रकरणांत विष दिलेली 9 वर्षाची मुलगी बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
या प्रकरणी विजय भगवान रोकडे यांनी पोलिसांना फिर्याद दिली असून ते म्हणाले, गजानन आणि त्यांची पत्नी पौर्णिमा रांजणगाव गणपती येथे वास्तव्यास असून दोघेही गोरेश्वर पतसंस्थेत नौकरीला होते. त्यांचे दोघे मुले चैत्राली आणि दुर्वेश हे आमच्याकडे लहानपणापासून राहत असल्यामुळे गजानन आणि पौर्णिमा त्यांना दर आठवड्यात भेटायला येत असे. गुरुवारी देखील ते मुलांना भेटायला आले असता त्यांना रात्री येण्याचे कारण विचारले असता

सुट्टी असल्यामुळे मुलांना पौर्णिमाच्या माहेरी न्यायचे आहे. शुक्रवारी हे चौघे मोटारसायकल वरून पौर्णिमाच्या माहेरी जाण्यासाठी  निघाले असता वाटेतच त्यांचे किरकोळ कारणांवरून भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने दोन्ही मुलांना विषारी औषध पाजले आणि मुलाला पाण्याच्या डबक्यात फेकून दिले आणि पौर्णिमाला साडीने गळफास दिला. नंतर स्वतः झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. 

घटनेची माहिती मिळतातच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि तिने मृतदेह ताब्यात घेतले आणि गजानन वर गुन्हा दाखल केला. नंतर मुलगी चैत्रालीने विष दिल्याचं पोलिसांना सांगितले तिला रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे.    

Edited By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार

सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही-शरद पवार

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी देशाचे 51 वे सरन्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली

सरकार बनताच 'लाडक्या बहिणींना' मिळणार 2100 रुपये-अमित शाह

महाराष्ट्रात निवडणूक उड्डाण पथकाने गाडी अडवून व्यावसायिकाकडून पैसे उकळले, 2 पोलिसांसह 5 जणांविरुद्ध एफआयआर

पुढील लेख
Show comments