इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर इराणने एक निवेदन जारी केले असून त्यांच्या हवाई संरक्षण यंत्रणेने इस्रायलचा हल्ला हाणून पाडला आहे. अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केल्याचे इराणने म्हटले आहे. पडलेल्या क्षेपणास्त्रे आणि रॉकेटमुळे फारच कमी नुकसान झाले आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने सांगितले की, इस्रायलची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट करण्यात आली. त्याचवेळी अमेरिकेने इराणला प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.
दोन्ही देशांनी एकमेकांवर लष्करी हल्ले थांबवण्याचा सल्लाही दिला आहे. इराणचा दावा - इस्रायलचा हल्ला फसलाइराणची राजधानी तेहरानमध्ये स्फोटाचे आवाज ऐकू आले. हवाई संरक्षण यंत्रणांनी तेहरान मधील तीन ठिकाणी हल्ले हाणून पाडले. इराणनेही इस्रायलला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली आहे. यापूर्वी इस्त्रायली लष्कराने एक निवेदन जारी करून इराणवरील हवाई हल्ल्याची माहिती दिली होती.
इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'आमचा संदेश स्पष्ट आहे की जर कोणी इस्रायलला धमकावण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.
या हल्ल्यानंतर इस्रायलने खबरदारीचा उपाय म्हणून आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हल्ल्यानंतर इराणनेही आपली हवाई हद्द बंद केली होती आणि सर्व उड्डाणे रद्द केली होती, मात्र आता इराणने आपली विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकाही इस्रायलच्या समर्थनात उतरली असून इराणला प्रत्युत्तराच्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.