मुळ भारतीय वंशाच्या पण सध्या ब्रिटनमधील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय नुसरत गनी यांनी शुक्रवारी ब्रिटिश संसदेला संबोधित केले. ब्रिटीश संसदेत भाषण करणाऱ्या त्या पहिल्या मुस्लिम महिला आहेत.
नुसरत यांचा जन्म बर्मिंघम येथे झाला. मात्र, त्यांचे आई-वडील मुळचे पाक व्याप्त काश्मीरमधील आहेत. कामानिमित्त ते बर्मिंघम येथ स्थायिक झाले. नुसरत यांना परिवहन मंत्रालयाचे मंत्रीपद देण्यात आले आहे.
संसदेला संबोधित केल्यानंतर नुसरत यांनी एक ट्विट केले. ट्विटमध्ये त्यांनी लिहलंय की, ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच मंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. हाऊस ऑफ कॉमन्स डिस्पॅच बॉक्समध्ये भाषण करणारी पहिली मुस्लिम महिला असल्याचा अभिमान वाटतो' अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.