Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धक्कादायक ! एका तरुणाने उन्हापासून वाचण्यासाठी कोल्ड्रिंक प्यायले,तरुणाचा मृत्यू

Shocking! A young man drank a cold drink to escape the sun
, रविवार, 26 सप्टेंबर 2021 (16:29 IST)
उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक काही थंड पेय पितात,थंड ठिकाणी जातात,जेणे करून त्यांना उष्णतेपासून बचाव होऊ शकेल.लोक थंडपाणी,कोल्डड्रिंकचा वापर सर्रास करतात. कोल्डड्रिंकच्या अतिसेवनामुळे त्रास होऊ शकतो. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक असत.डॉ देखील ह्याचे अतिसेवन करायला नाही म्हणतात. तरी ही काही लोक चव चांगली असल्यामुळे देखील अति सेवन करतात. परंतु कधी कधी असं करणं धोकादायक होऊ शकत.या मुळे आपल्याला जीव देखील गमवावा लागू शकतो.असचं काही घडले आहे.चीन मध्ये.इथे एका तरुणाने कडक उन्हात थंडगार शीतपेयाचे सेवन केले त्याने तब्बल दीड लिटर शीतपेयाचे सेवन केले.असं केल्यानंतर त्या तरुणाचा मृत्यू झाला. या तरुणाचे वय 22 वर्षाचे होते.शव विच्छेदनच्या अहवालात त्याचा मृत्यू कोल्डड्रिंकच्या अतिसेवनाने झाला आहे.
 
प्रकरण असे आहे की या तरुणाने कडक उन्हात उष्णता जाणवल्यामुळे घशाला कोरड पडली आणि त्याने घसा थंड करण्यासाठी कोल्ड्रिंक प्यायले एका क्षणात त्याने कोल्डड्रिंकची दीड लिटरची बाटली संपविली.थोड्याच वेळात त्याला पोटात वेदना होऊ लागली.
 
त्याच्या कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना त्याचे हृदय वेगाने धड्धडल्याचे जाणवले.त्याचा रक्तदाबही कमी झाला होता.डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे प्रयत्न केले परंतु ते अपयशी ठरले.त्या तरुणाचा मृत्यू झाला.
 
डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूचे कारण सांगितले की घाईघाईने जास्त थंड पेयांचे सेवन केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याने घाईघाईने ते कोल्डड्रिंक प्यायले या मुळे शरीरात जास्त थंड प्यायल्याने न्यूमॅटोसिस तयार झाले.या मुळे आतड्यात असामान्य वायू निर्माण झाला  आणि त्याचा मृत्यू झाला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CSK vs KKR IPL 2021 : पहिल्या षटकात केकेआरला मोठा धक्का बसला, गिल धावबाद झाला