Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

व्हिसा नियमात अमेरिकेने केले बदल

व्हिसा नियमात अमेरिकेने केले बदल
वॉशिंग्टन , शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (15:25 IST)
अमेरिकेने भारतीय नागरिकांसाठीच्या व्हिसा नियमात मोठे बदल केले आहेत. याचा फटका स्वतःच्या आरोग्याचा खर्च उचलू न शकणाऱ्या किंवा आरोग्याचा विमा नसलेल्या भारतीय नागरिकांना बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण येत्या नोव्हेंबरपासून अमेरिका अशा भारतीयांना व्हिसा नाकारण्याची शक्‍यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने या संदर्भातील निर्णय घेतला असून, अमेरिकेवरील स्थलांतरितांचा बोजा कमी करण्यासाठी ट्रम्प सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
अमेरिकेत नव्याने जाण्यासाठी जे व्हिसा मागतील, त्यांच्यासाठी हा नियम लागू असणार आहे. जे स्थलांतरित आधीपासून अमेरिकेत आहेत त्यांना हा नियम तूर्त लागू होणार नाही. त्याचबरोबर अमेरिकेत स्थायिक असलेल्या नागरिकांच्या भारतातून येणाऱ्या नातेवाईकांसाठी हा नियम विशेषत्वाने लागू होणार आहे.
 
अमेरिकी प्रशासनाच्या या नव्या नियमामुळे सुमारे 23 हजार भारतीय नागरिकांच्या व्हिसा प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे डोग रॅंड यांनी म्हटले आहे. रॅंड हे आधीच्या ओबामा प्रशासनात इमिग्रेशन विभागाचे अधिकारी होती. भारतातून दरवर्षी 35 हजार नागरिक अमेरिकेतील रहिवाशांचे नातेवाईक या आधारावर तिथे जात असतात. येत्या 3 नोव्हेंबरपासून या नव्या नियमाची अंमलबजावणी होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पशु-पक्ष्यांचा बळी देणं धार्मिक अधिकार नाही