Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिका निवडणूक निकाल : बायडन प्रशासनाकडे हस्तांतरण करायला ट्रंप राजी

Webdunia
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (16:16 IST)
अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना पदभार स्वीकारता यावा यासाठी हस्तांतरणाची अधिकृत प्रक्रिया सुरू करणं गरजेचं असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी स्वीकारलंय.
 
आपण निवडणुकीच्या निकालांना आव्हान देणं कायम ठेवणार असलो तरी 'ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे' ते करायला फेडरल एजन्सीला सांगत असल्याचं ट्रंप यांनी म्हटलंय.
 
जो बायडन हे या निवडणुकीतले यशस्वी उमेदवार ठरत असल्याचं अमेरिकेच्या जनरल सर्व्हिसेस ॲडमिनिस्ट्रेडशन - GSA ने मान्य केलंय.
 
अमेरिकेच्या मिशिगन राज्यात बायडन यांचा विजय झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. ट्रंप यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
 
ट्रंप काय म्हणाले?
अमेरिकेमध्ये कामकाजाचं हस्तांतरण एका राष्ट्राध्यक्षांच्या टीमकडून नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्षांकडे करण्याची प्रक्रिया जनरल सर्व्हिसेस ॲडमिनिस्ट्रेशन करतं. आपण हस्तांतरणाची ही प्रक्रिया सुरू करत असल्याचं GSAने बायडन यांना कळवलंय.
 
निर्वाचित राष्ट्राध्यक्षांसाठी 6.3 दशलक्ष डॉलर्सचा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं ॲडमिनिस्ट्रेटर एमिली मर्फी यांनी म्हटलंय.
 
आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचं सांगत ट्रंप यांनी म्हटलंय, "काहीही असलं तरी देशाचं हित लक्षात घेत मी एमिली आणि त्यांच्या टीमला ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्यास सांगितलं असून माझ्याही टीमला असंच करायला सांगितलंय."
 
ट्रंप यांनी दिलेल्या कायदेशीर आव्हानांबद्दलच्या सध्याच्या घडामोडी आणि निवडणूक निकालांवर करण्यात आलेलं शिक्कामोर्तब लक्षात घेता आपण हे पत्र पाठवलं असल्याचं मर्फी यांनी म्हटलंय.
 
"ही प्रक्रिया पुढे ढकल्याची कोणतीही सूचना मला देण्यात आली नव्हती, हे मी स्पष्ट करू इच्छिते. पण ही प्रक्रिया लवकर करावी असं सांगणाऱ्या धमक्या मला, माझ्या टीमला आणि माझ्या कुटंबाला ऑनलाईन, फोनवरून आणि ईमेलवरून देण्यात आल्या. इतक्या धमक्या येऊनही मी कायद्यानुसार प्रक्रिया करण्यास वचनबद्ध आहे." बायडन यांना लिहीलेल्या पत्रात मर्फींनी म्हटलंय.
 
निवडणूक आणि नवीन राष्ट्राध्यक्षांच्या कार्यकाळाची सुरुवात म्हणजेच इनॉग्युरेशनच्या दरम्यानच्या काळात हस्तांतरणाची प्रक्रिया करण्यात येते. पण ही प्रक्रिया लवकर सुरू न केल्याबद्दल एमिली मर्फी यांच्यावर दोन्ही राजकीय पक्षांकडून टीका करण्यात आली होती.
 
मर्फी यांनी आता पाठवलेल्या पत्राचं बायडन यांच्या टीमने स्वागत केलंय.
 
"आजचा निर्णय हे आपल्या देशासमोरच्या समस्या हाताळण्याच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. कोरोनाची जागतिक साथ आटोक्यात आणणं आणि देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणणं महत्त्वाचं आहे. हा निर्णय म्हणजे फेडरल एजन्सीजसोबत प्रशासकीय प्रक्रियांची अधिकृतरित्या सुरुवात आहे."
 
मिशिगनमध्ये काय घडलं?
मिशिगनमधल्या निवडणूक निकालांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. बायडन इथून दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकले आहेत. हा निकाल नक्की करताना मिशिगनमधल्या दोनपैकी एका रिपब्लिकन अधिकाऱ्याने इतर दोन डेमोक्रॅट अधिकाऱ्यांना निकाल नक्की करण्यात समर्थन दिलं.
 
इथले निकाल नक्की करणं दोन आठवड्यांनी पुढे ढकलावं अशी मागणी ट्रंप यांच्या रिपब्लिकन पाठिराख्यांनी केली होती.
 
आता हे निकाल नक्की करण्यात ले असले, तरीही आपण मिशिगनच्या निकालांना आव्हान देणार असल्याचं ट्रंप यांच्या पथकातल्या कायदा विभागाने म्हटलंय.
 
या निकालांवर शिक्कामोर्तब करणं ही साधी प्रक्रिया असल्याचं सांगत मिशिगनमधल्या अधिकारी जेना एलिस यांनी म्हटलंय. "हे निकाल योग्य आणि कायदेशीर असल्याची खात्री अमेरिकन नागरिकांना असावी."
 
14 डिसेंबरला बायडन यांच्या विजयावर अमेरिकन इलेक्टोरल कॉलेजमध्ये शिक्कामोर्तब होईल.
 
ट्रंप यांनी दिलेल्या कायदेशीर आव्हानांचं काय?
अमेरिकेतल्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये ट्रंप आणि त्यांच्या समर्थकांना कोर्टात एकामागोमाग एक पराभवांना सामोरं जायला लागलं आहे.
 
काही राज्यांतल्या रिपब्लिकन धोरणकर्त्यांनी स्वतःचे इलेक्टर्स नेमून त्यांना बायडन यांच्याऐवजी ट्रंप यांना मत देण्यास राजी करावं, यासाठीही ट्रंप कॅम्पेनने प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आलेलं नाही.
 
विस्कॉन्सिन राज्यात ट्रंप यांच्या मागणीवरून काही मतांची मोजणी पुन्हा करण्यात येतेय. या पुनर्मोजणीत ट्रंप समर्थक अडथळा आणत असल्याचा आरोप निवडणूक अधिकाऱ्यांनी केलाय.
 
ही प्रक्रिया मंदावण्यासाठी ट्रंप यांचे निरीक्षक अनेकदा एकेका मतावर आक्षेप घेत पुन्हा मोजदाद करायला लावत असल्याचं त्यांनी म्हटलंय.
 
पेन्सलव्हेनियामध्ये ट्रंप यांच्या कॅम्पेनने जवळपास 70 लाख मतदारांना कोणताही पुरावा न देता त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं रिपब्लिकन न्यायाधीशांनी म्हटलंय.
 
आता ट्रंप यांच्या वकिलांनी याबाबत फिलाडेल्फियाच्या सर्किट कोर्टात दाद मागितली आहे.
 
याच राज्यामधव्या बायडन यांच्या 80 हजार मतांच्या आघाडीत बदल घडवून आणण्याच्या ट्रंप यांच्या कायदेशीर प्रयत्नांनाही अपयश आलं.
 
जॉर्जियामध्येही पुनर्मोजणीत बायडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालंय. तिथेही पुन्हा एकदा मतमोजणी करण्याची मागणी ट्रंप कॅम्पेनने केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडी येण्याची शक्यता - केसी वेणुगोपाल

Maharashtra Assembly Election 2024 Live in Marathi: राहुल गांधींचा 5 लाखांच्या नोकऱ्या हिसकावून घेतल्याचा आरोप

नंदुरबारमध्ये राहुल गांधी म्हणाले, भाजप आणि आरएसएसने आदिवासींना वनवासी संबोधून त्यांचा अपमान केला

'तुमचा डिस्क्लेमर ट्रम्पच्या बातमीच्या खाली...', SC न्यायाधीशांनी NCP चिन्हाच्या वादावर केली टीका

Eknath Shinde Profile एकनाथ शिंदे प्रोफाइल

पुढील लेख
Show comments