इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा संस्थापक व वादग्रस्त धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईक याला भारतात पाठवणार नसल्याचे मलेशियाने स्पष्ट केले आहे. मलेशियाचे पंतप्रधान हातिर मोहमम्द यांनी सांगितले की, नाईकचे प्रत्यार्पण केले जाणार नाही.
पंतप्रधान मोहमम्द म्हणाले, 'जोपर्यंत नाईक आमच्या देशात काही समस्या निर्माण करत नाही तोपर्यंत त्याला आम्ही प्रत्यार्पित करणार नाही. कारण त्याच्याकडे मलेशियाचे नागरिकत्व आहे.' भारत आणि मलेशियादरम्यान दहशतवादविरोधी लढ्यासाठी सहकार्य वाढत आहे. तरीही नाईक मलेशियात आसरा घेण्यास यशस्वी झाला. पण पंतप्रधान मोदींच्या 31 मे च्या मलेशिया दौर्यानंतर नाईक सोरच्या अडचणी वाढल्या आहेत. चिथावणीखोर भाषण देणार्या नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला 2016 मध्ये बेकायदा घोषित करण्यात आले. झाकीरवर मनी लॉण्डरिंग आणि दहशतवादाचे गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी एनआयए तपास करत आहे. त्यामुळेच झाकीर मलेशियात पळाला होता.