Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

१०वी नापास तरुणाने अॅमेझॉनला लावला १.३ कोटींचा चुना

१०वी नापास तरुणाने अॅमेझॉनला लावला १.३ कोटींचा चुना
मुंबई , मंगळवार, 13 मार्च 2018 (11:24 IST)
एका १० वी नापास तरुणाने अॅमेझॉनला तब्बल १.३ कोटींचा चुना लगावला आहे. कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या युवकाने ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनला १.३ कोटींना चुना लावला आहे. दर्शन उर्फ ध्रुव असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४ लोकांना अटक केली आहे. या लोकांकडून २५ लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 21 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, एक आयपॅड आणि एक एप्पलच्या घड्याळाचा समावेश आहे. सोबतच ४ बाईक देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
 
आरोपी पैशांच्या ट्रान्सजेक्शनसाठी त्यांना देण्यात आलेल्या एका टॅबमधून हेराफेरी करायचा. तो त्याच्या मित्रांना वस्तूंची ऑर्डर टाकायला सांगायचा पण पैसे न घेताच त्यांना वस्तू डिलीव्हर करायचा. पोलिसांच्या माहितीनुसार या फ्रॉडची माहिती सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ मध्ये मिळाली. अमेझॉनला चिक्कामगलुरु शहरातून ४,६०४ वस्तूंची ऑर्डर मिळाली. या सगळ्या वस्तू दर्शनने डिलीवर केल्या होत्या. ज्या एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून तो करायचा. कार्ड पेमेंट सिस्टममध्ये गडबड करुन त्याने अशा प्रकारे या कंपनीला चुना लावला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्यापार्‍यांनी बुडवला 34 हजार कोटींचाजीएसटी?