suvichar

१०वी नापास तरुणाने अॅमेझॉनला लावला १.३ कोटींचा चुना

Webdunia
मंगळवार, 13 मार्च 2018 (11:24 IST)
एका १० वी नापास तरुणाने अॅमेझॉनला तब्बल १.३ कोटींचा चुना लगावला आहे. कर्नाटकमध्ये राहणाऱ्या एका २५ वर्षाच्या युवकाने ई-कॉमर्स वेबसाईट अॅमेझॉनला १.३ कोटींना चुना लावला आहे. दर्शन उर्फ ध्रुव असे त्याचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४ लोकांना अटक केली आहे. या लोकांकडून २५ लाखांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 21 स्मार्टफोन, एक लॅपटॉप, एक आयपॅड आणि एक एप्पलच्या घड्याळाचा समावेश आहे. सोबतच ४ बाईक देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
 
आरोपी पैशांच्या ट्रान्सजेक्शनसाठी त्यांना देण्यात आलेल्या एका टॅबमधून हेराफेरी करायचा. तो त्याच्या मित्रांना वस्तूंची ऑर्डर टाकायला सांगायचा पण पैसे न घेताच त्यांना वस्तू डिलीव्हर करायचा. पोलिसांच्या माहितीनुसार या फ्रॉडची माहिती सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ मध्ये मिळाली. अमेझॉनला चिक्कामगलुरु शहरातून ४,६०४ वस्तूंची ऑर्डर मिळाली. या सगळ्या वस्तू दर्शनने डिलीवर केल्या होत्या. ज्या एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून तो करायचा. कार्ड पेमेंट सिस्टममध्ये गडबड करुन त्याने अशा प्रकारे या कंपनीला चुना लावला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

Virgin Boy Egg मुलांच्या लघवीत अंडी उकळून तयार कॉफी का पीत आहेत हे लोक? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हवामान विभागाने महाराष्ट्रासह १५ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'हाय अलर्ट' दिला

मुंबई-गोवा महामार्गावर 'रास्तारोको' आंदोलन; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा, वाहतुकीवर मोठा परिणाम

विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार; उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि अमोल मिटकरी यांसारख्या मोठ्या नेत्यांना आज निरोप दिला जाणार

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधान मोदी: ३ लाख हुन अधिक भारतीय सुखरूप परतले

पुढील लेख
Show comments