Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मनातील विचरांद्वारे होईल संगीतनिर्मिती

मनातील विचरांद्वारे होईल संगीतनिर्मिती
शास्त्रज्ञांनी एक नवीन मेंदू- संगणक इंटरफेस अॅप विकसित केले असून ते विचरांच्या शक्तीद्वारे संगीतनिर्मिती करण्यास सक्षम आहे. हे अॅप संगीताची धून तयार करण्यासाठी शारीरिक कार्ये बदलू शकते. त्याच्या मदतीने शारीरिक अपंगत्व असलेली व्यक्ती मेंदूच्या शक्तीद्वारे विशेष कृत्रिम अवयव नियं‍त्रित करू शकते, इंटरनेटर सर्फिंग तसे ईमेलही लिहू शकते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
 
ऑस्ट्रियातील ग्राझ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी या अॅपच्या कीद्वारे एकदम वेगळ्या प्रकारच्या धून तयार करण्याचा प्रयोग दाखविला. या नव्या अॅपच्या मदतीने विचारांद्वारे संगीतनिर्मिती करण्यासोबतच ते स्तानांतरीतही केले जाऊ शकते. त्यासाठी फक्त मेंदूचा लहरींची नोंद घेऊ शकणारी टोपी डोक्यावर परिधान करणे व संगीतरचना करण्यासाठी थोडेसे संगीताचे ज्ञान आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला प्रशिक्षण दिले व प्रकाशादरम्यान इच्छित पर्यायावर लक्ष केंद्रित केले तर त्यामुळे मेंदूच्या लहरी एक मिनिटभर बदलतात, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय हवाई दलाचे MI17हेलिकॉप्टर कोसळले