Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

जीओ4 जी चा डाऊनलोड स्पीड कमी, ट्रायचा खुलासा

जीओ4 जी चा डाऊनलोड स्पीड कमी, ट्रायचा खुलासा
, बुधवार, 6 जून 2018 (14:52 IST)
गेल्या काही दिवसांमध्ये Jio 4जीचे डाऊनलोड स्पीड कमी झाले आहे. त्या तूलनेत Jio 4जीचा प्रतिस्पर्धी असलेल्या एअरटेलचे स्पीड मात्र काही प्रमाणात वाढले आहे. टेलिकॉम रेग्युलेटर अथॉरिटी ट्रायच्या मायस्पीड अॅपने या डेटा स्पीडबाबत खुलासा केला आहे. हा सलग दुसरा महिना आहे. ज्यात Jio 4जीचे स्पीड कमीच राहिले आहे. २०१८मध्ये जीओचे स्पीड कमी राहण्याची ही तिसरी वेळ आहे. पण, रिलायन्सच्या स्पर्धक कंपन्या एअरटेल, वोडाफोन आणि आयडीया आदी कंपन्या मात्र आपले स्पीड काय ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत.
 
ट्रायने मायस्पीड अॅपद्वारे शेअर केलेल्या डेटानुसार, Jio 4जी डाऊनलोड स्पीड एप्रिल २०१८ मध्ये १४.७ एमबीपीएस राहिला. तर, २ महिन्यात हेच स्पीड सुमारे ३३ टक्क्यांनी कमी दिसले. पहिले हे स्पीड २१.३ एमबीपीएस होते. त्यामुले Jio 4जीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वात जास्त डाऊनलोड स्पीड दिले. तेव्हा ट्रायच्या अॅपमध्ये २५.६ एमबीपीएस डाऊनलोड स्पीड रजिस्टर्ड केली होती. एअरटेलने ९.२ एमबीपीएससोबत एप्रिल २०१८मध्ये दुसरा, आयडियाने ७.४ एमबीपीएसमध्ये तिसरा तर वोडाफोनने ७.१ एमबीपीएसमध्ये चौथे स्थान पटाकवले.
 
दरम्यान, अपलोडबाबत आयडियाने ६.५ एमबीपीएस अपलोड स्पीडसोबत पहिला क्रमांक कयम ठेवला. त्यानंतर वोडाफोनचा क्रमांक लागतो. वोडाफोन ५.२ एमबीपीएस इतके स्पीड देतो. जिओ आणि एअरटेल हे अनुक्रमे ४ एमबीपीएस आणि ३.७ एमबीपीएससोबत तिसरा आणि चौथ्या क्रमांकावर राहतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘काला’ला सुरक्षा द्या, कोर्टाचा आदेश