Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आता फेसबुकही म्युझिक व्हिडीओ ऍप आणणार

आता फेसबुकही म्युझिक व्हिडीओ ऍप आणणार
, शनिवार, 27 ऑक्टोबर 2018 (10:06 IST)
फेसबुक आता एक म्युझिक व्हिडीओ ऍप आणणार आहे. या ऍपचे नाव असणार आहे ‘लॅस्सो’. खास तरुण पिढीला डोळ्यांसमोर ठेवून हा ऍप बनवला जात आहे. त्यावर कोणत्याही गाण्यावर नाचता येईल आणि ‘लिप सिंक’ म्हणजेच ओठ हलवून त्या गीताची रेकॉर्डिंगही करता येणार आहे. या ऍपमध्ये गाण्याची मर्यादा 15 सेकंदांपेक्षा जास्त असेल. टिकटॉक ऍपमध्ये ही मर्यादा फक्त 15 सेकंद इतकीच आहे. त्यामुळे ‘लॅस्सो’ हा टिकटॉकला चांगलीच टक्कर देणार आहे. अलीकडेच फेसबुकने एक नवे फिचर बनवले आहे. त्यात आपण आपल्या प्रोफाईलमध्ये कोणतेही गाणे टाकू शकतो. लिप सिंक लाइव्ह फिचर आणण्याचाही फेसबुकचा विचार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

काय आहे ग्रीन क्रॅकर्स? सर्वोच्च न्यायालयाने ज्यांना इको-फ्रेंडली म्हटले !