Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय लष्कराकडून ८९ ऍप्स बॅन, अशी आहेत नाव

Indian Army orders personnel to delete 89 apps
, गुरूवार, 9 जुलै 2020 (08:43 IST)
भारतीय लष्कराकडून ८९ ऍप्स बॅन करण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने आपल्या जवानांना आणि कर्मचाऱ्यांना ८९ ऍप्समधील सर्व ऍप डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. मेसेजिंग प्लॅटफॉर्म, वेब ब्राउझर, कंटेंट शेयरिंग, गेमिंग इत्यादीवरील सेवेवर सैन्याने बंदी घातली आहे. ज्यामध्ये फेसबुक, टिकटॉक, ट्रूकॉलर (Truecaller), इंस्टाग्राम (Instagram), यूसी ब्राउजर, PUBG इत्यादी ऍप्सचा समावेश आहे. 
 
जवानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय या निर्णयाचे  पालन  न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. १५ जुलै पर्यंत ८९ ऍप्स आपल्या स्मार्ट फोनमधून काढून टाकण्याचे आदेश भारतीय लष्कराने जवानांना दिला आहे.

भारतील लष्कराकडून बॅन करण्यात आलेले ऍप
 
मेसेजिंग प्लॅटफॉर्म - वी चॅट, क्यूक्यू, किक, आऊ वो, निम्बज, हेलो, क्यू जोन, शेयर चॅट, वायबर, लाइन, आयएमओ, स्नो, टो टॉक, हाइक.
 
व्हिडिओ होस्टिंग: टिक-टॉक, लाइकी, समोसा, क्वाली
 
कंटेंट शेयरिंग: शेयर इट, जेंडर, जाप्या
 
वेब ब्राउजर: यूसी ब्राउजर, यूसी ब्राउजर मिनी
 
व्हिडिओ आणि लाइव स्ट्रिमिंग : लाइव मी, बिगो लाइव, झूम, फास्ट फिल्म्स, वी मेट, अप लाइव, विगो व्हिडिओ
 
यूटिलिटी ऍप : कॅम स्कॅनर, ब्यूटी प्लस, ट्रू कॉलर
 
गेमिंग ऐप्स: पबजी, नोनो लाइव, क्लॅश ऑफ किंग्स, ऑल टेंसेंट गेमिंग एप्स, मोबाइल लीजेंड्स
 
ई कॉमर्स: अली एक्सप्रेस, कल्ब फॅक्ट्री, गियर बेस्ट, चायना ब्रांड्स, बँग गुड, मिनिन द बॉक्स, टायनी डील, डीएचएच गेट, लायटेन द बॉक्स, डिएक्स, एरिक डेस्क, जॉफुल, 
 
टिबीड्रेस, मोडिलिटी, रोजगल, शीन, रोमवी
 
डेटिंग ऐप: टिंडर, ट्रूअली मॅडली, हॅप्पन, आयल, कॉफी मीट्स बॅजल, वू, ओके क्यूपिड, हिंग, एझार, बम्बली, टॅनटॅन, एलीट सिंगल्स, टॅजेड, काउच सर्फिंग  
 
एंटी व्हायरस: 360 सिक्योरिटी
 
NW: फेसबुक, Baidu, इंस्टाग्राम, एलो, स्नॅपचॅट
 
न्यूज ऍप्स : न्यूज डॉग, डेली हंट
 
ऑनलाइन बुक रीडिंग: प्रतिलिपि, वोकल
 
हेल्थ ऍप: हील ऑफ वाई
 
लाइफस्टाइल ऍप : पॉपएक्सो
 
नॉलेज ऐप: वोकल
 
म्यूझिक ऐप्स: हंगामा
 
ब्लॉगिंग/मायक्रो ब्लॉगिंग: येल्प, तुम्बिर, रेडिट, फ्रेंड्स फीड, प्रायव्हेट ब्लॉग्स 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीतले 'हे' आहेत