जागतिक स्तरावर भारतातील इंटरनेट सेवा सर्वात स्वस्त आहे. देशात प्रति जीबीकरिता ग्राहकांना अवघे १८.५० रुपयेच मोजावे लागत आहे. जागतिक स्तरावर ही किंमत सरासरी प्रति जीबी तब्बल ६०० रुपये आहे.‘केबलडॉटकोडॉटयूके’ने याबाबत केलेल्या सर्वेक्षणात इंटरनेट वापरकर्त्यां देशांचा हा कल स्पष्ट झाला आहे. याकरिता भारत, अमेरिका, ब्रिटनसह विविध २३० देशांमधील इंटरनेट वापर तपासून पाहण्यात आला.
भारतात इंटरनेटचे मूल्य प्रत्येक जीबीमागे ०.२६ डॉलर तर अमेरिकेत तेच १२.३७ डॉलर आणि ब्रिटनमध्ये ६.६६ डॉलर आहे. याबाबत जागतिक सरासरी ८.५३ डॉलर आहे.