Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

आता व्हॉट्सअॅप अॅडमिनच्या अधिकारात बदल

आता व्हॉट्सअॅप अॅडमिनच्या अधिकारात बदल
, बुधवार, 2 मे 2018 (16:03 IST)
आता व्हॉट्सअॅपमध्ये अॅडमिनच्या अधिकारात बदल होणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या 2.18.132 व्हर्जनमध्ये हे बदल दिसून येतील. अॅडमिनला आता नवीन ग्रुप सेटिंग ऑप्शन्स ग्रुप इंफो पेजवर दिसतील. त्यावर टॅप केल्यास नवीन पेज ओपन होईल. त्यात  editing the group’s info आणि change the group’s admins असा ऑप्शन दिसेल. त्यात all participants आणि only admin असे पर्याय दिसतील. यासाठी व्हॉट्सअॅपचे 2.18.132 हे व्हर्जन डाऊनलोड करायचे आहे.
 
व्हॉट्सअॅपमध्ये नवेनवे व्हर्जन्स सातत्याने अपडेट होत असतात. आतापर्यंत  व्हॉट्सअॅप ग्रुप अडमिनला जास्त अधिकार होते. त्यांचे ग्रुपवर खूप नियंत्रण होते. ते लोकांना ग्रुपमध्ये अॅड करु शकत होते. रिमूव्ह करु शकतात. पण ग्रुपचे नाव, आयकॉन बदलण्यावर अॅडमिनचे नियंत्रण नव्हते. ग्रुपमधील कोणताही सदस्य ते करु शकत होता. त्यामुळे काही अडचणींना सामोरे जावे लागत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनुष्काच्या कानातल्यावर सर्वांची नजर