Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

व्हाट्स अ‍ॅप्स नंतर आता जीमेल, गूगल पे आणि क्रोम क्रॅश अशी सेटिंग करा

व्हाट्स अ‍ॅप्स नंतर आता जीमेल, गूगल पे आणि क्रोम क्रॅश अशी सेटिंग करा
, मंगळवार, 23 मार्च 2021 (18:36 IST)
जर आपल्या मोबाईल मध्ये गूगल सह जीमेल,गूगल पे,गूगल क्रोम चालत नाही तर काळजी नसावी. सेटिंग बदलून आपण हे पुन्हा सुरु करू शकता. 
काही दिवसांपूर्वी व्हाट्स अ‍ॅप्स आणि आज मंगळवारी गूगलचे अनेक अ‍ॅप्स क्रश झाले होते. यात जीमेल, गूगल पे,गूगल क्रोम चा समावेश आहे. या मुळे बरेच वापरकर्ते चिंतीत होते. ते जीमेल देखील उघडू शकत नव्हते. गूगल ने देखील गूगलचे काही अ‍ॅप्स क्रॅश झाल्याचे कबूल केले आहे. त्यावर काम सुरु आहे. काम पूर्ण झाल्यावर यूजर्स ला समजेल. या समस्येला अँड्रॉइड यूजर्सला सामोरी जावे लागत आहे. जर आपल्या देखील अँड्रॉइड फोन मध्ये हे सर्व अ‍ॅप्स चालत नाही तर त्या बद्दल काळजी नसावी. आपण सेटिंग मध्ये काही बदल करून हे सुधारू शकता.    
 
जीमेल साठी डेस्कटॉप आवृत्ती वापरा
आपल्या अधिकृत पेजवर याची पुष्टी करताना जीमेल म्हणे, की आम्हाला हे माहीत आहे की वापरकर्त्यांना जीमेल वापरण्यात अडचणी येत आहे.अनेक यूजर्स जीमेल वापरण्यात अक्षम आहेत. लवकरच ही समस्या दूर करण्यासाठी या वर आम्ही काम करीत आहोत. हे लवकरच अपडेट करण्यात येईल. जीमेल म्हणे की काही काळ यूजर्स ने अँड्रॉइड अ‍ॅप्स ऐवजी डेस्कटॉप वरून जीमेल वापरावे. 
मंगळवार पहाटे पासून गूगल यूजर्स ला या समस्येला सामोरी जावे लागत आहे. बरेच अ‍ॅप्स चालत नाही. 
 
अहवालानुसार,अँड्रॉइड वेबव्यूव्हमुळे ही समस्या उद्भवली आहे.ही एक क्रोमसंचालित वैशिष्टये आहे. जे यूजर्सला अँड्रॉइड अ‍ॅप्स मधील वेबपेज बघण्याची परवानगी देते. गूगल म्हणे की या वेबव्ह्यू मुळे काही अ‍ॅप्स  क्रॅश झाले आहेत. आम्ही त्याची संपूर्ण तपासणी करत आहोत आणि लवकरच या समस्येचे समाधान करण्यात येईल. 
 
अशा प्रकारे सेटिंग बदला -
सॅमसंग यूएस तज्ज्ञांनी सुचवले आहेत की यूजर्सने वेब व्यूह अपडेट काढून फोन रिस्टार्ट करावे तर ही समस्या नाहीशी होईल. 
या साठी यूजर्सला सेंटिंग मध्ये जावे लागेल त्यानंतर अ‍ॅप्स वर जाऊन उजव्या कोपऱ्यात असलेले तीन डॉट्स वर टॅप करा. इथे शो सिस्टम अ‍ॅप्स दिसेल. या सह एक ऑप्शन देखील दिसेल सर्च अँड्रॉइड सिस्टम वेबव्यूह त्याला अनइन्स्टॉल करा.सॅमसंग सह हे इतर अँड्रॉइड अ‍ॅप्स साठी देखील काम करेल. तथापि, वेबव्यूह एक महत्त्वपूर्ण वेब आहे म्हणून यूजर्स ने ते काढून टाकताना काळजी घ्यावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अनिल देशमुख: फोन टॅपिंग आरोप झालेल्या रश्मी शुक्ला कोण आहेत?