Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

Google Search करताना सावध रहा, नाहीतर रिकामे होईल बँक अकाउंट

Google Search करताना सावध रहा, नाहीतर रिकामे होईल बँक अकाउंट
, मंगळवार, 23 मार्च 2021 (17:21 IST)
Google आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग झाला असून काही शोधायचे म्हटलं की हात आपोआप गुगलवर सर्च करण्यासाठी जातात. आपण बर्‍याचपैकी गुगल सर्च इंजिनवर अवलंबून आहोत आणि यामुळे आपले अनेक प्रश्न पटकन सुटतात हे देखील खरे आहे परंतू काही गोष्टीचा शोध घेताना सावध राहण्याची गरज आहे नाहीतर हे सर्च आपल्याला महागात पडू शकतं. येथे आम्ही सांगत आहोत अशा सर्चबद्दल ज्या चुकूनही गुगलवर शोधू नये. गुगलवर या गोष्टी सर्च करण्यापूर्वी सावध राहण्याची गरज आहे-
 
1. Customer Care Number 
गुगल सर्चवर कस्टमर केअर नंबर सर्च करणे चांगलेच महागात पडू शकते. यावर कधीही कस्टमर केअरचा नंबर सर्च करु नये. कोणत्याही कंपनीच्या कस्टमर केअर नंबर गुगलवरुन सर्च करुन त्यावर बोलणे टाळावे. अनेक प्रकरणं समोर आली आहेत ज्यात गुगलवरुन कस्टमर केअर नंबर डायल केल्याने फसवणूक झाली आहे. गुगलवर कस्टमर केअरचा नंबर सर्च करताना सायबर गुन्हेगार फायदा घेतात आणि बनावट कंपनी तयार करत चुकीच्या कस्टमर केअरचा नंबर वापरुन आपली वैयक्तिक माहिती गोळा करुन आपलं बँक अकाउंट रिकामें करतात.
 
2. Bank Website
सध्या ऑनलाईन बँकिंगचा जास्त वापर असल्यामुळे अनेक लोक गुगलवर बँकेची वेबसाइट सर्च करतात. पण असे करताना सावध राहण्याची गरज आहे. हे आपल्यासाठी धोकादायक असू शकते. सायबर गुन्हेगार बँकेची डुप्लिकेट वेबसाइट तयार करुन बँकेच्या आपली माहिती गोळा करतात. युआरएलमध्ये जरासा फरक आपल्याला लक्षात येत नाही आणि अशात हॅकर्सच्या जाळ्यात अडकून खाते रिकामे होतात. ऑनलाइन बँकिंग करताना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन व्यवहार करावे.
 
3. App
आपल्या मोबाईलमध्ये कुठलेही अॅप्स किंवा सॉफ्टवेअर प्ले स्टोअरवरवरून डाऊनलोड करणे सुरक्षित आहे. कारण थेट गुगलवरुन डाउनलोड करणे धोक्याचे असू शकतं. अनेकदा जे अॅप्स गुगलवरुन डाऊनलोड केले जातात ते प्ले स्टोअरवर साडपत नाहीत. कोणतीही फाइल, सॉफ्टवेअर आणि अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी गुगल सर्च करणं खूपच धोकादायक ठरू शकतं. फेक लिंकमुळे व्हायरस किंवा मेलवेअरचा धोका वाढतो.
 
4. Investment
 
Investment करण्यासाठी गुगल सर्च केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारात येत नाही. कारण हॅकर्ससाठी हे सोपे टार्गेट असतात. हॅकर्स बनावट कंपनी तयार करुन फसवणूक करु शकतात.
 
5. Health and Beauty 
आपली गरज ओळखून आपल्या फसवणे अगदी सोपं जातं. गुगलवर अनेकदा एकाप्रकाराचे सर्च केल्यावर आपल्याला चुकीचा सल्ला मिळू शकतो. आजारावर किंवा सुंदर दिसण्याच्या टिप्स बघताना चुकीचे प्रोडक्टस आणि बनावट कंपन्या आपला फायदा घेऊ शकतात. यावर ऑर्डर किंवा सेवन करणे धोकादायक ठरु शकतं.
 
6. Online Shopping
त्याच प्रमाणे काही शॉपिंग करण्यासाठी नावजलेल्या कंपन्या सोडून हजारो कंपन्या गुगलवर दिसतात पण त्या फेक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात कंपनीचे नाव, पत्ता, नंबर याची माहिती मिळत नाही किंवा त्याचे प्रोडक्ट्स खरे आहे वा फेक हे माहित नसल्याशिवाय त्यावरून काही मागवणे धोकादायक ठरु शकतं. अनेकदा अशा साइट्सवर संपर्क क्रमाकं किंवा कस्टमर केअर नंबर देखील उपलब्ध नसतात परंतू कमी किंमती बघून ऑर्डर देणे आणि आपली वैयक्तिक माहिती शेअर करणे धोक्याचे ठरु शकतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मंत्र्यांवर अतिशय गंभीर आरोपानंतरही त्यांची साधी चौकशी नाही, शिवसैनिकांमध्ये नाराजी