Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेटवर्क गुल झाल्याने #vodafoneindia हॅशटॅग ट्रेंडिंगवर

#vodafoneindia on trending
, गुरूवार, 15 ऑक्टोबर 2020 (16:16 IST)
मुंबई- पुण्यातील काही भागांत आयडिया- व्होडाफोनच्या ग्राहकांना  सकाळपासून नेटवर्क नसल्याच्य़ा समस्येला सामोरे जावे लागले. कंपनीकडूनही ग्राहकांना काही ठोस उत्तर मिळत नसल्याने #vodafoneindia हा हॅशटॅग ट्रेंडिंगवर आहे. नेटवर्क गेल्याने व्होडाफोन- आयडीयाची नवीन नावाची कंपनी व्हीआयचे नेटवर्क गेल्याचा अनुभव अनेकांना आला. पुण्यातील काही जुन्या आयडिया ग्राहकांना इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे या ग्राहकांनी सांगितले. 
 
पुण्याप्रमाणे नागपूरमध्येही नेटवर्क नसल्याचे सांगितले जात आहे. मुंबईशेजारील अंबरनाथ, बदलापूर येथील देखील व्होडाफोन कंपनीची रेंज मिळत नाहीय. अनेकांचे फोन लागत नसल्याच्या तक्रारी सुरु आहेत. याचबरोबर अमरावतीयेथील आयडिया ग्राहकांना देखील कालपासून रेंजची समस्या जाणवू लागली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खाजगी रुग्णालयात निश्चित व अल्प दरात रेमडिसेव्हिर मिळणार