इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप(WhatsApp) ने व्हॉट्सअॅप वेब आणि डेस्कटॉपसाठी (WhatsApp Web or Desktop) नवीन सिक्योरिटी फीचर्सची घोषणा केली आहे. आता वापरकर्त्यांना वेब किंवा डेस्कटॉपवर त्यांचे खाते उघडण्यासाठी त्यांचे वेरिफिकेशन करावे लागेल. वापरकर्त्यांना फिंगरप्रिंट स्कॅनिंग किंवा फेस रिकॉगनाइजेशनची परवानगी द्यावी लागेल. येत्या आठवड्यात सिक्योरिटी फीचर्स लॉन्च केली जाऊ शकतात.
कंपनीचे म्हणणे आहे की वापरकर्त्याने त्यांचे खाते वेब किंवा डेस्कटॉपशी कनेक्ट करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्यापूर्वी फोनवर चेहरा किंवा फिंगरप्रिंट अनलॉक वापरणे आवश्यक आहे. सांगायचे म्हणजे की आतापर्यंत व्हॉट्सअॅप वेब वापरण्यासाठी फक्त एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागत होता.
व्हॉट्सअॅप मल्टी डिव्हाईस लॉगिन फीचर देखील जोडू शकेल
मल्टी-डिव्हाइस लॉगिन लवकरच फेसबुकच्या मालकीच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सएपमध्ये सादर केले जाऊ शकते. आता आपण एकावेळी कॉम्प्युटरवर आपल्या व्हॉट्सअॅप खात्याला लॉग इन करू शकता. परंतु आता येणार्या काळात मल्टी-डिव्हाईस लॉगिन करू शकता. कंपनीने स्वतः ट्विट करून या फीचर्सविषयी माहिती दिली आहे.
असे करा वापर
1. व्हॉट्सअॅप वेब किंवा व्हॉट्सअॅप डेस्कटॉपमध्ये आपले खाते लिंक करण्यासाठी प्रथम तुमच्या फोनमध्ये दिलेला व्हॉट्सअॅप उघडा.
2. आता उजवीकडे वरच्या बाजूस दिलेल्या तीन डॉटच्या मदतीने सेटिंग्ज बारवर जा.
3. यानंतर व्हॉट्सअॅप वेब / डेस्कटॉपवर क्लिक करा.
4. अँड्रॉइड यूजर्स Link a Device वर क्लिक करा. यानंतर, जेव्हा आपला फोन स्क्रीनवर बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन दर्शवेल, तेव्हा त्या प्रक्रियेचे अनुसरणं करा.
5. येथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण क्यूआर कोड स्कॅन कराल आणि आपले खाते आपल्याला कोठेतरी लॉगिन करण्यास सांगत असेल तर लगेच लॉग आऊट करा.