अष्टमीची रात्र होती, यमुनेस पूर,
आनंदली वसुधा, कंसास लागे हुरहूर,
सावळे रूप, मनमोहक कित्तीतरी,
वसुदेव-देवकी सुखावली अंतरी,
आला होता "तो" संहार कराया हेतू,
मनात नव्हताच त्यांच्या किंतु-परंतु,
पोहोचला सुखरूप नन्दाच्या घरी,
यशोदे ने केला सांभाळ, वाढला श्रीहरी,
सुखावले गोकुळ, पाहुनी बाललीला,
हर्ष किती मनात झाला मतापित्याला,
नांदले सुखात गोकुळ, कृष्ण छायेखाली,
ऐकून पावा सुरेल राधा मंत्रमुग्ध झाली,
रासलीला रचली प्रभुने, गोकुळात पहा,
वेड लागले सावळ्या तनु चे, विलोभनीय अहाहा,
महात्म्य असें बरेंच आहे, मधुसूदनाचे,
जन्मोत्सव असें आज "कान्हाचा" हेच महात्म्य आज दिवसाचे.!
!!राधे कृष्ण, गोपाळ कृष्ण !!
.....अश्विनी थत्ते