मुख्य लढत : हंसराज अहिर (भाजप) विरुद्ध बाळू धानोरकर (काँग्रेस)
भाजपचे हंसराज अहिर हे चंद्रपूरचे विद्यमान खासदार आहेत. आतापर्यंत ते चार वेळा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेत. त्याचे फळ त्यांना २०१४ मध्ये मिळाले असून मोदी सरकारमध्ये हंसराज अहिर यांना केंद्रीय गृहराज्यमंत्री पदी संधी देण्यात आली. शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश धानोरकर हे आमदार होते.
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.