Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेसबुक, इन्स्टाग्रामवर मास्क विकणाऱ्या जाहिरातींवर बंदी

Webdunia
गुरूवार, 12 मार्च 2020 (09:57 IST)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्रामने आपल्या सोशल प्लॅटफॉर्मवर, मेडिकल फेस मास्क विकणाऱ्या जाहिरातींवर बंदी घातली आहे. कोरोना व्हायरसच्या आपत्कालीन परिस्थितीत लोकांचा गैरफायदा घेतला जाऊ नये यासाठी ही बंदी घालण्यात आली आहे. फेसबुकवर ट्रस्ट/ इंटिग्रिटी टीमचं (जाहिराती आणि व्यावसायिक उत्पादनांसाठी) नेतृत्व करणाऱ्या रॉब लीथर्न यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची घोषणा केली.
 
रॉब लीथर्न यांनी 'आम्ही मेडिकल फेस मास्क विकणाऱ्या जाहिराती आणि प्रोडक्ट लिस्टिंगवर बंदी घालत आहोत. कोविड-१९ वर आमची नजर आहे. या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा कोणी फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं आढळल्यास, आम्ही आमच्या धोरणांमध्ये आवश्यक त्या सुधारणा करणार असल्याचं,' लीथर्न यांनी ट्विट केलं आहे.
 
इस्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी यांनीदेखील, रॉब लीथर्न यांच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे.
 
एडम मोसेरी यांनी, 'पुरवठा कमी आहे आणि किंमती जास्त आहेत. आम्ही या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीचा फायदा घेत असलेल्या लोकांच्या विरोधात आहोत. येत्या काही दिवसांत आम्हीदेखील याची सुरुवात करणार असल्याचं,' त्यांनी सांगितलं.
 
कोरोना व्हायरस संबंधित शोधांसह या माध्यमातून, जागतिक आरोग्य संघटनेकडून आवश्यक सूचना असलेला पॉपअप किंवा माहिती आपोआप येईल याबाबतही फेसबुकने घोषणा केली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

LIVE: भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांना अटक

मुंबई-पुणे मिसिंग लिंक अपघातात काँग्रेसचे तरुण नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू

हिमाचलच्या चंबामध्ये भीषण बस अपघात, ७ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

भारतावर १००% शुल्क लावण्याची तयारी? सिनेटने विधेयक मंजूर केले

दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे नामिबियामध्ये टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका खेळणार

पुढील लेख
Show comments