suvichar

पुणे: नवरीमुलगी पुढे बुलेटवर, वरात मागे, अशी पोहचली मंडपात

Webdunia
लाल रंगाची नऊवारी, नाकात नथ, हातात हिरव्या बांगड्या आणि डोळ्यावर काळा चष्मा लावून बुलेटवर स्वार मुलगी. हा सिनेमाचा दृश्य नव्हे तर एक शेतकर्‍याची मुलगी लग्नासाठी स्वत:ची वरात मागे घेऊन मंडपात पोहचणारी आजची नारी आहे.
 
हल्ली वेगळ्या प्रकारे लग्न करण्याची धून असल्यामुळे नवरदेव आणि नवरीमुलगी काही तरी नवीन करण्याच्या फिराकीत असतात. असेच एक अनोखे विवाह पुण्यात झाले. ज्यात नवरीमुलगी नऊवारी नेसून, नटून थाटून डोळ्यावर काळा चष्मा लावून बुलेट चालवत मंडपात पोहचली.
 
कोमल शहाजी देशमुख असे या मुलीचे नाव असून तिने 5 किमीचा रस्ता बुलेटने पार केला आणि तिच्यामागे नवरदेव आणि वराती कारने येत होते. तिच्यासोबत काही इतर लोकंदेखील बाइकने सोबत चालत होते. अनेक लोकांना मुलीची हा अंदाज खूप पटला.
 
मुलीचे वडील शेतकरी आहे. त्यांनी सांगितले की मुलीला बुलेट चालवण्याचा खूप शौक आहे आणि तिला बुलेटने स्वत:च्या लग्नाला येण्याची इच्छा देखील होते आणि तिच्या इच्छेला मान देऊन आम्ही सर्वांनी होकार दिला. अशा प्रकारे समाजाला संदेशही दिला की वरात घेऊन येण्याचा हक्क केवळ मुलाकडे आरक्षित नव्हे. तसेच मुली मुलांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमतर नाही हे देखील समाजाला दाखवायचे होते.
 
लोकांनी मुलीच्या या स्टाइलचे भरभरून कौतुक केले. आणि आता ती बुलेट राणी म्हणून ओळखली जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

नवीन

Ban on THAR! या राज्यात भाड्याच्या थारवर बंदीची तयारी; जाणून घ्या सरकारचा प्लॅन

तेलवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ट्रम्प यांचा इराणवर बॉम्बहल्ला

LIVE: महाराष्ट्राच्या संपूर्ण किनारपट्टीवर भरतीचा इशारा

लोणावळा-कर्जत घाटात झालेल्या भूस्खलनामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ३६ तासांसाठी विस्कळीत

स्वित्झर्लंडने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले

पुढील लेख
Show comments