दमदार अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या घटनेनंतर पुन्हा एकदा मानसिक आरोग्याची जोरदार चर्चा होऊ लागली. या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नसलं तरी नैराश्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या घटनेनंतर गुगलवर नैराश्य Depression म्हणजे काय हे अधिकाधिक सर्च केलं जाऊ लागलं. गेल्या २४ तासांत नेटकऱ्यांनी ‘डिप्रेशन’ हा शब्द करोना व्हायरसपेक्षाही जास्त सर्च केला आहे.
केरळ, नागालँड, बिहार, मध्यप्रदेश, गुजरात या देशांमध्ये हा सर्च जास्त केला गेला. सुशांतच्या डिप्रेशनमागचं कारण, डिप्रेशनचा अर्थ काय याबाबत नेटकऱ्यांनी सर्च केलं.