Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

येडियुरप्पांनी घेतली शपथ

Webdunia
गुरूवार, 17 मे 2018 (08:47 IST)
कर्नाटक विधानसभा निवडणुकी नंतर येडियुरप्पा यांनी  बंगळुरू येथे राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. येडियुरप्पा हे तिसर्‍यांदा कर्नाटकाचे मुख्यमंत्री पदावर आरूढ झाले आहेत. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचला. येडियुरप्पांच्या शपथविधीला विरोध करत काँग्रेस-जेडीएसने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली.  त्यानंतर  कोर्टाने मध्यरात्री ऐतिहासिक सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणं राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असं म्हणत कोर्टानं यात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टानं  शपथविधी रोखण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत.

मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदिल दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे.

न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेस-जेडीएसच्यावतीने खंडपीठासमोर आपली बाजू मांडली. तर भाजपाकडून मुकुल रोहतगी तर केंद्र सरकारच्यावतीनं वकिल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रकला बसची धडक, 18 प्रवासी जखमी

IND vs SA: संजू सॅमसन T20 मध्ये सर्वात जलद सात हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला

अमित शहांनी केली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा!

राष्ट्रपतीपदाची लढाई जिंकल्यानंतर ट्रम्प यांना फेडरल कोर्टातून दिलासा

अमन सेहरावत बंगळुरू येथे आयोजित होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भाग घेणार

पुढील लेख
Show comments