Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज यांचे गांधीजीना अभिवादन, भाजपवर टीका

mns chief
, मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018 (17:57 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपहासात्मपणे महात्मा गांधीजींच्या जयंतीचे अभिवादन केलं आहे. राज यांनी व्यंगचित्रातून नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केलं आहे. आपल्या व्यंगचित्रातून महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी व्यक्त होताना, राज यांनी मोदींना आधुनिक गांधी बनवले आहे. त्यामध्ये, मोदी चरखा चालवत असून ते कपडापासून सूत तयार करत आहेत. विशेष म्हणजे भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावरील कपडे काढून हे सूत बनविण्यात येत असल्याचे व्यंगचित्रात दिसत आहे. तर देशाची अर्थव्यवस्था आणि विचारवादाचा उडालेला गोंधळ कचऱ्याच्या ढिगासारखा गुंडाळल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून सूचवले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'या' मंदिरातही भाविकांना पारंपरिक पोषाखातच प्रवेश