Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा मोदी नाही

narendra dabholkar
, शुक्रवार, 20 एप्रिल 2018 (15:21 IST)
अमेरिकेतील प्रसिद्ध टाइम मासिकाने जगभरातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्थान दिलेलं नाही या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, कॅनाडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान, चीनचे राष्ट्रपती शी चिनपिंग, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन, आयर्लंडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लियो वराडकर आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या दिग्गज राष्ट्रप्रमुखांचा ‘टाइम’च्या यादीत समावेश आहे.
 
जागतिक 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत विविध विभागात केवळ चार भारतीयांनीच स्थान मिळवलं आहे.  यामध्ये ओला कॅबचे सह संस्थापक भावीश अग्रवाल, अभिनेत्री दीपिका पदुकोण, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय वंशाचे मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सीबीएसई बोर्ड: टायपींगमधील चुकीमुळे विद्यार्थ्यांना २ गुण