Dharma Sangrah

राज ठाकरें यांनी चहा - वडापाववर मारला ताव

Webdunia
कोकण दौऱ्यात राज ठाकरेंनी यांनी  चक्‍क एका स्‍टॉलवर वडापाव खाल्‍ला. बुधवारी सायंकाळी देवगड येथील आपला दौरा आटोपून ते कणकवलीच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांनी अचानक गाडयाचा ताफा थांबवून कोळोशी बाजारपेठेतील एका छोट्याशा स्‍टॉलवर  वडापाव आणि चहाचा मनापासून आस्वाद घेतला. 
 
राज यांना वडापाव स्टॉलवर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्‍या.  गाडी थांबताच राज यांनी तेथील श्रीकृष्ण उर्फ संदीप शिंदे यांच्या हॉटेल आसरामधील वडापावचा स्टॉल गाठला. राज यांनी सामान्य ग्राहकाप्रमाणे शिंदे यांच्याकडून वडापाव घेतला आणि बाकड्यावर बसून गरम-गरम वडापावचा आस्‍वाद घेवू लागले. काही वेळात ही बातमी परिसरातील लोकांना समजताच नागरिकांनी शिंदे यांच्या हॉटेलवर गर्दी केली.  यावेळी त्‍यांनी उपस्थितांना वडापाव खाणार काय? अशी विचारणा केली. राज यांनी अनेक ठिकाणच्या गप्पा करत-करत वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतला. हॉटेलवर जमलेल्या नागरिकांनाही वडापाव वाटप करण्यास कार्यकर्त्यांना सांगितले. शेवटी वडापाव मस्त होता हो! असे म्हणत शिंदे कुटुंबीयांसोबत त्यांनी फोटो देखील काढला आणि शिंदे यांचा निरोप घेतला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

अशोक खरात यांच्या मुलानंतर आता त्यांच्या मुलीची चौकशी सुरू आहे; त्यांची पत्नी अद्याप फरार

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी अंतिम इशारा दिला, यावेळी मुदतवाढ दिली जाणार नाही

बारामती पोटनिवडणुकीपूर्वी संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा दिल्या; म्हणाले....

बुलढाण्यात अन्नातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू

LIVE: शरद पवार म्हणाले अजितसोबत जे घडले त्यानंतर कुटुंबाने निवडणूक लढवायला नको

पुढील लेख
Show comments