‘गलतीकिस्की’ हि मालिका सुपर कॉप किरण बेदी लिखित 'व्हॉट वेंट राँग अँड व्हाय?' या पुस्तकावर आधारित आहे.
भारतातील आघाडीच्या एम अँड ई समूहातील श्री अधिकारी ब्रदर्स यांनी आणखी एक क्लासिक हिट शो 'गलतीकिस्की' हा शो पुन्हा प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. हा शो सुपर कॉप आणि पुडुचेरीचे विद्यमान लेफ्टनंट गव्हर्नर - किरण बेदी लिखित 'व्हॉट वेंट राँग अँड व्हाय?' या पुस्तकावर आधारित आहे. हा कार्यक्रम राष्ट्रीय दूरदर्शन वर दररोज १ वाजता प्रसारित होत आहे.
किरण बेदी यांनी लिहिलेले 'व्हॉट व्हेंट राँग अँड व्हॉय?' या पुस्तकावर आधारित 'गलतीकिस्की’ हा शो वास्तविक जीवनावर आधारित आहे. वास्तविक जीवनातील प्रथमदर्शनी अनुभवांचे एक अनोखे संकलन - प्रामाणिक, मार्मिक, हृदयस्पर्शी आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा, जे लोकांना घरी बसून दखल घेण्यास भाग पाडेल. सामाजिक आणि आर्थिक गैरसोयीचे वास्तविक प्रतिकूल परिणाम जे आजच्या समाजात विपरित परिणाम करतो आणि अशा परिस्थितीत मदत मागणार्यांसाठी अशी परिस्थिती आणि प्रसंग कशा पद्धतीने हाताळता येऊ शकते याचा परामर्श करून मार्गदर्शन केले जाते. जे अशा घटनांना प्रतिबंधित करण्यात भूमिका बजावू शकतात आणि कर्तव्ये स्वीकारण्याची जबाबदारी असते त्यांचे कौतुक जाते.
Sri Adhikari Brothers, sharing below press release on GaltiKiski’ या प्रसंगी मर्कंड अधिकारी म्हणाले, "दूरदर्शनला आमची शो मालिकांची लायब्ररी उपलब्ध करुन देण्याच्या आमच्या बांधिलकीच्या अनुषंगाने सुपर कॉप किरण बेदी यांची वैशिष्ट्यीकृत 'गलतीकिस्की’ दूरदर्शन नॅशनलवर प्रदर्शित होणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. आपल्या देशाला लॉकडाऊन दरम्यान व्यस्त राहण्यास आणि परिस्थिती सामान्य राहण्यासाठी जे करावे लागेल त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू." किरण बेदी (लेखक आणि पुडुचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर) म्हणाल्या'' आयपीएस अधिकारी असताना, त्या प्रवासादरम्यान मी लोकांच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यावर नेहमीच भेदभाव पाहिला आणि त्यातील बहुतेक जणांमध्ये दयेचा अभाव होता. पुस्तक हे निष्पक्ष आणि मानवी असण्याचा प्रयत्न केला आहे. 'गलतीकिस्की’ हा शो माझे ध्येय फक्त पुढील बळी वाचवणे हे होते, ते प्रसिद्धी किंवा लोकप्रियता मिळविण्याकरिता नव्हते तर लोकांनी सावधगिरी बाळगण्यावर आधारित होते. श्री अधिकारी ब्रदर्स यांच्यासह याची दूरचित्रवाणी आवृत्ती तयार केल्याबद्दल मला खूप सन्मान वाटतो आणि या भीषण काळात दूरदर्शन नॅशनलवर हा शो पुन्हा प्रसारित होणार असल्याने, लोक लॉकडाऊननंतर आत्मनिरीक्षण व आयुष्याविषयी पुनर्विचार करून या समाजाला एक चांगले एकसंघ समाज म्हणून राहण्यासाठी एक चांगले स्थान बनवण्याची संधी आहे. ''