Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवमाश्याची उलटीची किंमत दोन कोटी, तस्कराला पकडले, देवमाश्याची उलटी इतकी महाग का ? वाचा

The value of the whale fish 2 crore
, बुधवार, 19 जून 2019 (10:07 IST)
देवमासा अर्थात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. जी. दुपारे (वय 53) या तस्कराला ताब्यात घेतलं. घाटकोपरमध्ये व्हेल माशाची उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी, वन विभागाने संयुक्तरित्या कारवाई केली आणि अटक केली. या तस्कराकडून पोलिसांनी 1 किलो 130 ग्राम वजनाची उलटी जप्त केली असून, परदेशात याची किंमत जवळपास 1 कोटी 70 लाख रुपये आहे.
 
पोलिसांनी कृष्ण जी. दुपारेला न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने दुपारेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर दुपारे याच्या माहितीवरुन पोलिसांनी त्याच्या आणखी एका साथीदाराला अटक केली. 
 
मात्र व्हेल माशाच्या उलटीची तस्करी का?
 
व्‍हेल माशाची उलटी जेव्हा घनरुप घेते तेव्हा त्यापासून एक विशिष्ट प्रकारचा दगड तयार होतो. या दगडाला परदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. याला समुद्रात तरंगणारं सोनंही म्हटलं जातं. या दगडापासून मोठ्या ब्रॅण्डचे परफ्यूम तयार केले जातात. अनेक वैज्ञानिक या दगडाला व्हेल माशाची उलटी असे म्हणतात तर काही याला माशाचं मल देखील मानतात. व्हेलच्या शरीरातून एक अनावश्यक द्रव्य बाहेर पडतो. हे द्रव्य माशाच्या आतड्यांमधून बाहेर पडत असतो, हे द्रव्य व्हेल पचवू शकत नाही म्हणून तो शरिराबाहेत टाकतो. कधी कधी व्हेल उलटीद्वारे हे द्रव्य बाहेर टाकते. वैज्ञानिक भाषेत याला एम्बरग्रीस असं म्हणतात. मात्र याचा मागोवा घेवून अनेक तस्कर ती मिळवतात व काळ्या बाजारात विकतात. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घोषणा करण्याच्या नादात या सरकारने अर्थसंकल्पही अगोदरच फोडला - अमित देशमुख