Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाळाच्या पाळण्याखाली मोठा साप निघाला व्हिडीओ पाहा

big snake coming out from under the cradle of a baby
, शनिवार, 17 डिसेंबर 2022 (11:21 IST)
सापाचं नाव ऐकल्यावर अंगाचा थरकाप उडतो आणि प्रत्यक्ष साप समोर आल्यावर काय होणार हे विचार करून देखील शहारे येतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बाळाच्या पाळण्याचा खाली भला मोठा साप आला आणि पाळण्यात झोपवणाऱ्या आईने ते पाहतातच बाळाला घेऊन पळ काढत आपला आणि बाळाचा जीव वाचवला.हा व्हिडीओ snakes video नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या
 
 
या  व्हिडीओ मध्ये दिसत आहे की एक आई आपल्या चिमुकल्याला झोपवायला झोपाळ्यात बसून झोका घेते घरात भला मोठा साप कधी आला हे त्या माउलीला कळले नाही. सापाला पाळण्याच्या जवळ येतानाचे तिला समजल्यावर ती घाबरते आणि त्वरित आपल्या बाळाला पाळण्यातून काढून पळ काढते. हे सर्व दृश्य घरातील सीसीटीव्ही केमेऱ्यात कैद झाले आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी फ्रान्स खेळाडूंना संसर्गाची लागण