एका महिलेने एकच ड्रेस जवळपास तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी परिधान करून एक नवा विक्रम बनवला आहे. बोस्टन येथे राहणाऱ्या सारा रॉबिन्स या महिलेने एकच काळा ड्रेस शंभर दिवसांपर्यंत घालून विक्रम केला आहे. आपल्या या विक्रमामुळे ती चर्चेचा विषय ठरत असून तिचं कौतुक केलं जातं आहे.
एकच ड्रेस सलग 100 दिवस घातल असताना तिनं ड्रेसचे निरनिराळे स्टाईल देखील केले आणि अनेक कार्यक्रमात सहभागी देखील झाली. साराने 16 सप्टेंबर 2000 रोजी शंभर दिवसांच्या ड्रेस चॅलेंज मध्ये सहभाग घेतला होता. द मिरर च्या अहवालानुसार तिने 100 दिवस तोच ड्रेस घालून आपली सर्व काम केली आणि अनेक समारंभ देखील सामील झाली.
ती म्हणाली की मी क्रिसमस किंवा न्यु इयरला देखील कोणत्याही नव्या कपड्यांची खरेदी केली नाही. या दरम्यान तिला समजलं की तिच्याकडे प्रत्येक ठिकाणी जाण्यासाठी निरनिराळे कपडे आहेत जे कपाटात धूळ खात आहे. ती म्हणाली की नव्या फॅशन शिवाय देखील जगता येतं आणि निश्चितच पृथ्वीला होणारे नुकसान टाळता येऊ शकतात यासाठी तिने हे चॅलेंज स्वीकारलं.
हे चॅलेंज कमी वस्तूंमध्ये कशा प्रकारे समाधानी राहता येऊ शकतं या उद्देशाने देण्यात आले होते.