suvichar

दीर्घायुषी होण्यासाठी कामातून सुट्टी घेणे आहे गरजेचे

Webdunia
आपल्याला दीर्घायुष्य लाभावे, असे सगळ्यांनाच वाटते. तुमचीही अशी इच्छा असेल तर तुम्हाला आपल्या कामातून काही दिवस सुट्टी घेऊन सहलीला जाण्याची गरज आहे, असा खुलासा एका नव्या अध्ययनातून झाला आहे. तब्बल 40 वर्षे सुरू असलेल्या या अध्ययनातून असे समोर आले आहे की, ज्या लोकांनी वर्षभरात तीनआठवड्यांपेक्षा कमी सुट्टी घेतली, त्यांच्या मृत्यूची शक्यता सुट्टी घेणार्‍या लोकांच्या तुलनेत तिप्पट जास्त होती. फिनलँडमधील युनिव्हर्सिटी ऑफ हेलसिंकीचे प्राध्यापक टीमो स्ट्रँडबर्ग यांनी सांगितले की, तुमची जीवनशैली हेल्थी आहे व तुम्ही आपल्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेता. त्यामुळे सुट्टी न घेता सतत घेतलेली कठोर मेहनत तुम्हाला काहीच हानी पोहोचवत नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, दीर्घायुष्य व तणावातून सुटका हे मुद्दे येतात तेव्हा फक्त आरोग्यदायक आहार व नियमित व्यायामच पुरेसा नाही. त्यासाठी तुम्हाला कामातून सुट्टी घेणे गरजेचे आहे. 1970मध्ये या अध्ययनाची सुरुवात झाली होती. त्यात 1919 ते 1934 दरम्यान जन्मलेल्या 1,200 मध्यमवयीन लोकांचा समावेश करण्यात आला होता. या सगळ्यांना उच्च रक्तदाब, धू्म्रपान व लठ्ठपणामुळे ह्रदयविकाराचा धोका होता. अध्ययनात सहभागी 50 टक्के  लोकांना व्यायाम, खाण्यापिण्याची पथ्ये, व्यसनमुक्ती व वजन नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

200 मेगापिक्सेल कॅमेरा आणि शक्तिशाली बॅटरीसह मोटो G मॅक्स लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घ्या

LIVE: फडणवीस सरकार रोहित पवरांच्या उपोषणापुढे झुकले! शेतकरी कर्जमाफीच्या अटी बदलणार

जागतिक पेटंट क्रमवारीत अव्वल 20 मध्ये स्थान मिळवणारी जिओ ही एकमेव भारतीय टेक कंपनी ठरली

पालघर : करिअरचे आश्वासन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; फुटबॉल प्रशिक्षकाला अटक

पुढील लेख
Show comments