Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फॉर हेल्दी ऑफिस लाईफ

office management
ऑफिसमध्ये बसल्या बसल्या बिस्किटांचे पुडे रिकामे करताय? वेफर्सच्या पाकिटांनी डस्टबीन भरून गेलंय? समोसा, वडापावच्या पार्ट्या नेहमीच्या जाल्यात? असं करत असालतर सावध व्हा. ऑफिसमध्ये हेल्दी पर्याय निवडता येतील. चणे, दाणे, सुका मेवा, चुरमुरे असलं काही तरी खाता येईल. 
 
* मित्रांनो, मीठमुळे रक्तदाब वाढतो, त्यामुळे पॉपकॉर्न, वेफर्स, चटपटीत बिस्किटं असल्या स्नॅक्सना फाटा द्या. त्याऐवजी एखादं फळ खा. 
 
* ऑफिसमध्ये बसून काम करावं लागतं हे खरं पण सलग सात ते आठ तास बसून राहू नका. तासभरानं उठा व एखादी चक्कर मारून या. 
 
* तुम्ही स्वत: धूम्रपान करू नका. इतरांना करू देऊ नका. अनेक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये स्मोक रूम असते. सहकार्‍यांना या स्मोक रूमचा वापर करायला सांगा. 
 
* कामाचा ताण घेऊ नका. वर्क मॅनेजमेंट हा स्ट्रेस कमी करण्याचा फंडा आहे. कामाचं नीट नियोजन करा. घरी आल्यावर कामाचा विचार करू नका. घरच्यांसोबत निवांत वेळ घालवा. 
 
* श्वासांकडे लक्ष द्या. दीर्घ श्वसन करा. पाच‍ मिनिटं थांबू दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वसनाची सवय लावून घ्या. 
 
* कामाच्या नादात पाणी प्यायला विसरू नका. एखादी बाटली स्वत:जवळ ठेवा. तहान लागल्यावर पाणी पिण्याचा कंटाळा करू नका. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात का खाऊ नये मासोळी?