Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिला व बालविकास विभागासाठी अर्थसंकल्पात काय आहे?

Webdunia
गुरूवार, 9 मार्च 2023 (22:11 IST)
राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात शेतकरी, महिला, विद्यार्थी, तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवण्यात येणार असल्याचे प्रस्तावित आहे. महिला व बालविकास विभागासाठी या अर्थसंकल्पात 2843 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 
 
एसटी प्रवासात सरसकट ५० टक्क्यांची सूट
राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांना आता अवघ्या निम्म्या दरांत प्रवास करता येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरणार आहे.
 
महिलांसाठी आणखी योजना काय?
चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
मुंबईत महिला युनिटी मॉल ची स्थापना
महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार
 
‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
अकरावीत 8000 रुपये
मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
 
नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे, दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’  नवी योजना
शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करून केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार
 
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
 
अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्रातील 7 खासदारांना संसदरत्न 2025 हा पुरस्कार जाहीर

मुंबई विमानतळावरील दोन कर्मचाऱ्यांना सोन्याच्या तस्करीच्या आरोपात अटक

अमेरिकेत क्लिनिकजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू

आयआयटी मुंबईने तुर्की विद्यापीठांसोबतचे सर्व करार रद्द केले

Russia Ukraine War :रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका महिलेचा मृत्यू, तीन जखमी

पुढील लेख
Show comments